शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारतोफा थंडावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:36 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

पोलिंग पार्ट्या रवाना : दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकगडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक विभागाने प्रचार करण्याची मुदत रविवारी रात्री १२ वाजेपर्यंतच दिली असल्याने सोमवारपासून या भागातील प्रचारतोफा थंडावल्या असून पोलिंग पार्ट्या रवाना होण्यास सुरूवात झाली आहे. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या चार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. १६ जिल्हा परिषद क्षेत्र व ३२ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक घेतली जात आहे. एटापल्ली तालुक्यातील कर्मचाऱ्यांना रविवारी सकाळी ५.३० वाजताच तालुका मुख्यालयात बोलाविण्यात आले. त्यामुळे कर्मचारी शनिवारीच एटापल्ली येथे मुक्कामाने होते. दिवसभरात हेलिकॉप्टरने जवळपास १० चकरा मारून जारावंडी, कसनसूर भागातील पोलिंग पार्ट्यांना पोहोचवून दिले.एटापल्ली तालुक्यातील ७१ पैकी एक मतदान केंद्र संवेदनशील तर ७० मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहे. भामरागड तालुक्यातील एकूण ३१ मतदान केंद्रांपैकी तीन मतदान केंद्र संवेदनशील, २१ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व सात मतदान केंद्र साधारण आहेत. अहेरी तालुक्यातील एकूण १०७ मतदान केंद्रांपैकी ३६ मतदान केंद्र संवेदनशील, ४६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील, २५ मतदान केंद्र साधारण श्रेणीत मोडणारी आहेत. सिरोंचा तालुक्यातील ७८ मतदान केंद्रांपैकी ३१ मतदान केंद्र संवेदनशील, ३७ मतदान केंद्र अतिसंवेदनशील तर १० मतदान केंद्र साधारण श्रेणीत मोडणारे आहेत. एकूण २८७ मतदान केंद्रांपैकी ७१ मतदान केंद्र संवेदनशील तर १७४ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. चारही तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्र संवेदनशील असल्याने पोलिंग पार्ट्या व पोलीस दलाची वाहतूक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केली जात आहे. आज बहुतांश पार्ट्या तालुका मुख्यालयातून निघून बेस कॅम्पवर थांबणार आहेत. त्यानंतर सदर पोलिंग पार्ट्या सोमवारी मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत. चारही तालुक्यांमध्ये अतिरिक्त पोलीस ताफा बोलविण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)१९३ वाहने निवडणूक कामातचारही तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यासाठी १९३ वाहने लागणार आहेत. याशिवाय अतिरिक्त वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. एटापल्ली तालुक्यात ७१ केंद्रांवर २८४ कर्मचारी व १४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नेण्यासाठी २९ जीप, ५ बसगाड्या व ६ शासकीय वाहने वापरली जात आहेत. भामरागड तालुक्यातील ३१ मतदान केंद्रांवर ६ क्षेत्रीय अधिकारी व १२४ कर्मचाऱ्यांना रवाना करण्यासाठी २१ जीप, २ बसगाड्या व ३ शासकीय वाहने वापरली जात आहेत. अहेरी तालुक्यातील १०७ मतदान केंद्रांवर २१ क्षेत्रीय अधिकारी व ४२८ कर्मचाऱ्यांना रवाना करण्यासाठी ४३ जीप, ८ ट्रक, ९ मिनीट्रक, १२ बसगाड्या व २३ शासकीय वाहने ताब्यात घेतली आहेत. अतिदुर्गम नक्षल प्रभावीत सिरोंचा तालुक्यात ७७ मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. १५ क्षेत्रीय अधिकारी व ३०८ कर्मचाऱ्यांना संबंधित बुथवर रवाना करण्यासाठी १९ जीप, १ ट्रक, ५ राज्य परिवहन महामंडळाच्या ५ बसगाड्या व ६ शासकीय वाहने वापरण्यात येत आहेत.