शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टाकीचे काम बंद

By admin | Updated: October 12, 2015 01:52 IST

आष्टी गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्राम पंचायत प्रशासनाने येथे पाण्याची टाकी व वाढीव पाईपलाईनचे काम मंजूर केले. सदर काम ३० टक्के झाले आहे.

आष्टी : आष्टी गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्राम पंचायत प्रशासनाने येथे पाण्याची टाकी व वाढीव पाईपलाईनचे काम मंजूर केले. सदर काम ३० टक्के झाले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप आष्टी ग्राम पंचायतीच्या काही सदस्यांनी मासिक सभेत केला. त्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने या कामाच्या कंत्राटदाराचे दुसरे बिल रोखून धरले. तेव्हापासून आष्टीच्या वाढीव पाणीपुरवठा टाकीचे काम बंद पडले आहे. परिणामी आष्टी गावातील पाणी समस्या कायम आहे.पूर्वी आष्टी गावाची लोकसंख्या ४ हजार ७०० होती. लोकसंख्येत वाढ होऊन सध्या आष्टी गावाची लोकसंख्या ६ हजारवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या दोन वर्षांपासून आष्टी गावात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली. पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्राम पंचायतीने आष्टी येथे नव्याने पाण्याची टाकी व वाढीव नळ पाईपलाईनचे काम २ मे २०१५ रोजी मंजूर केले. त्यानंतर या कामासाठी १ कोटी ८९ लाख रूपये मंजूर झाले. सुरुवातीला ५८ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर एका खासगी कंत्राटदाराकडून सदर पाणीटाकीचे काम सुरू करण्यात आले. ३० टक्के काम झाल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला ५८ लाख रूपयांचे पहिले बिल अदा केले. त्यानंतरही कंत्राटदाराने पाणीटाकीचे काम सुरू केले. ४० टक्के काम झाल्यानंतर कंत्राटदाराचे ५४ लाख ७८ हजार रूपयांचे दुसरे बिल तयार झाले. दरम्यान ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी सुरू असलेल्या पाणी टाकीच्या कामावर आक्षेप घेतला. संबंधित खासगी कंत्राटदाराकडून या कामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असून सदर कामाचा दर्जा ढासळला आहे, असा आरोपही त्यांनी ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत केला. ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांनी संबंधित कंत्राटदाराचे दुसरे बिल रोखून धरण्याचे एकमताने ठरविले. तेव्हापासून सदर पाणीटाकीचे काम रखडले आहे. (प्रतिनिधी)