शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

आरमोरी मार्गाच्या पुनर्बांधणीला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 23:06 IST

दुसरीकडे आता या ३२ किलोमीटरच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नागपूर मार्गामुळे गडचिरोली ते आरमोरी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरून नागपूर, ब्रह्मपुरी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरचीसह, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते.

मनोज ताजनेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आता आलापल्ली-सिरोंचा या कुप्रसिद्ध राष्ट्रीय महामार्गानंतर दुसरा क्रमांक गडचिरोली-आरमोरी मार्गाचा लागतो. अनेक मार्गांच्या पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली असताना सर्वाधिक वर्दळीच्या असलेल्या आरमोगी मार्गाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जाण्याआधी मध्येच गायब केला आहे. दुसरीकडे आता या ३२ किलोमीटरच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नागपूर मार्गामुळे गडचिरोली ते आरमोरी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरून नागपूर, ब्रह्मपुरी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरचीसह, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर अशी तात्पुरती डागडुजी टिकूच शकत नाही हे सामान्य माणसाला कळणारे सत्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणसारख्या महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना कळू नये, ही बाब आश्चर्यकारक ठरत आहे. सध्या गडचिरोली-आरमोरी मार्गात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस त्यांचे प्रमाण वाढत आहे. याचा त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची पुनर्बांधणी आता प्राधान्याने करणे गरजेचे होते. मात्र, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसलेच नाहीत.

रस्त्याचा प्रस्ताव का बारगळला?वास्तविक यावर्षीच्या वार्षिक आराखड्यासाठी महामार्ग प्राधिकरणच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली-आरमोरी (देऊळगाव) या ३२ किलोमीटरच्या महामार्गाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव दिला होता; परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांनी या मार्गावर यापूर्वी झालेल्या कामाची मुदत भरायची आहे. त्यामुळे ‘तांत्रिकदृष्ट्या’ हा रस्ता चांगला आहे असे समजून या कामाचा प्रस्ताव यावर्षीच्या आराखड्यासाठी केंद्र सरकारकडे न पाठवता मध्येच बाद केला. प्रत्यक्षात मात्र मुदत संपण्याआधीच या रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न शिल्लक आहे. निव्वळ डागडुजीच्या नावाखाली मलिदा खाण्यासाठी, तर रस्त्याच्या पुनर्बांधणीला ठेंगा देण्यात आला नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे.

एकीकडे परवानगी मिळण्याआधीच वर्क ऑर्डरआलापल्ली ते सिरोंचा मार्गाच्या कामासाठी आधीच मंजुरी मिळाली होती. त्यानुसार वन विभागाच्या परवानगीची वाट न पाहता वर्षभरापूर्वीच निविदा प्रक्रिया करून ७ ते ८ महिन्यांपूर्वी संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली. वास्तविक वन विभागाचा अडसर असल्यामुळे त्या कामाची वर्कऑर्डर घेणारे कंत्राटदार डोक्यावर हात मारून बसले आहेत. दुसरीकडे कोणताही अडथळा नसलेल्या आरमोरी मार्गाचे काम टाळण्यात आले. यावरून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग