शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST

वडसा रेल्वे सल्लागार समितीची कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांनंतर पहिली सभा आयोजित केली होती. या सभेत गडचिरोली जिल्ह्यातील ...

वडसा रेल्वे सल्लागार समितीची कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांनंतर पहिली सभा आयोजित केली होती. या सभेत गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन असलेल्या वडसा रेल्वेस्टेशन मार्गे दरभंगा-सिकंदराबाद एक्सप्रेस, कोरबा-यशवंतपूर एक्सप्रेस, चेन्नई- गया एक्सप्रेस या तीन लांब पल्ल्याच्या गाड्या आठवड्यातून ये-जा करीत आहेत. आता जबलपूर-चांदा फोर्ट एक्सप्रेस दररोज धावणार आहे. यातील एकही रेल्वे वडसा रेल्वेस्टेशनवर थांबत नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना कवडीचाही फायदा होत नाही. त्यामुळे या चारही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा थांबा वडसा रेल्वेस्टेशन येथे देण्यात यावा, या प्रमुख मागणीसह दोन्ही प्लॅटफॉर्मवर कोच इंडीकेटर लावणे, प्लॅटफॉर्म नंबर दोनवर अनाऊंसमेंट सुविधा देणे, शुद्ध पाणी मिळण्याकरिता आर. ओ. लावणे, प्लॅटफॉर्म नंबर १ वर बोअरवेल खोदणे, ब्रम्हपुरी रोडवरील रेल्वे पादचारी उड्डाणपूल कुरखेडा आरमोरी रोडपर्यंत वाढविणे, प्रतीक्षालय हॉलचे सुरू असलेले बांधकाम तातडीने पूर्ण करणे आदी मागण्यांचा प्रस्ताव सर्वानुमते ठराव पारित करुन पाठविण्यात आला आहे. यावेळी वडसा रेल्वेस्टेशनचे प्रबंध व्यवस्थापक संजय कुमार यांच्यासह नवनियुक्त वडसा रेल्वे सल्लागार समिती सदस्य राजेश जेठानी, डॉ. विष्णू वैरागडे, दीपक विधाते, शालुताई दंडवते, संतोष शामदासानी, सचिन खरकाटे, प्रीतपालसिंग टुटेजा आणि ऋषी शेबे प्रामुख्याने उपस्थित होते.