शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कायदे व हक्कांविषयी जागृत राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:17 IST

सद्याच्या आधुनिक युगात प्रत्येक नागरिकाला कायदेविषयक परिपूण माहिती असणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देन्या.मेहरे यांचे प्रतिपादन : धानोरात विधी सहाय्य चिकित्सालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : सद्याच्या आधुनिक युगात प्रत्येक नागरिकाला कायदेविषयक परिपूण माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय आपल्या अधिकार व हक्काची जाणीव असावी, विधी सहाय्य चिकित्सालयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. मेहरे यांनी केले.तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय धानोरा आणि ग्रामपंचायत लेखा (मेंढा) याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी धानोरा येथे विधी सहाय्य चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कायदेविषयक शिबिरही घेण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव तथा मुख्य न्याय दंडाधिकारी बी.एम. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष लि.दा. कोरडे, समाजसेवक देवाजी तोफा, अधिवक्ता टी.के. गुंडावार, विधी सेवा स्वयंसेवक सुनीता झंझाळ, घनश्याम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी न्यायाधीश मेहरे यांनी विधी सहाय्य चिकित्सालयाची कार्यपद्धती व महत्त्व अनेक उदाहरण देऊन पटवून दिले. तसेच चिकित्सालयात नेमण्यात आलेल्या अधिवक्ता व विधी सेवा स्वयंसेवकाच्या मदतीने गरजू लोकांनी या चिकित्सालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य न्यायदंडाधिकारी पाटील यांनी चिकित्सालयाबाबत माहिती दिली. तसेच न्या. कोरडे यांनी अंमली पदार्थामुळे पीडित व्यक्तींना विधीसेवा व अंमली पदार्थाचे निर्मूलन, योजना २०१५ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाचे ग्रामसेवक कुनघाडकर, संचालन म्हशाखेत्री यांनी केले तर आभार झंझाळ यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील इतर पदाधिकाºयांनीही सहकार्य केले. यावेळी लेखा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.