शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी राज्य सरकार मुहूर्त शोधतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:36 IST

महाराष्ट्रात मागील अडीच वर्षात कर्जाला कंटाळून ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

कुरखेडात कार्यक्रम : जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन कुरखेडा : महाराष्ट्रात मागील अडीच वर्षात कर्जाला कंटाळून ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र फडणवीस सरकार कर्जमाफीकरिता मुहूर्ताची वाट पाहात आहे. शासनाने बुलेट ट्रेनकरिता १ लाख कोटी तर मेट्रोकरिता कोट्यवधींचा खर्च करण्याची तयारी चालविली आहे. मात्र शेतकऱ्यांचे ३० हजार ५०० कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडे पैसा नाही, ही शोकांतीका आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आ. जोगेंद्र कवाडे यांनी केले. कुरखेडा येथे डॉ. आंबेडकर भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कृपाशरण महास्थावीर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. जावेद पाशा, प्रा. राजकुमार शेंडे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, सविता बेदरकर, पिरिपा जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, विजय बन्सोड, विजय शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पी. आर. आकरे, नलीनी माने, पत्रूजी ढवळे, मारोती भैसारे, मारोती जांभुळकर, प्रमोद सरदारे, संतोष खोब्रागडे, दयाराम खोब्रागडे, बालक भानारकर, भीमाबाई सरदारे, मुकेश खोब्रागडे, संघमित्रा ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी आ. कवाडे यांनी या देशाची राज्यघटना निर्माण झाल्यापासून ती बदलविण्याचे कटकारस्थान काही प्रवृत्ती करीत आहे. त्यांनी खुशाल घटना बदलवावी, आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे समतेचे राज्य आणू असे यावेळी सांगितले. प्रा. जावेद पाशा यांनी शाहू, फुले, आंबेडकर चळवळीचा लढा हा समता परिवर्तनाचा नसून व्यवस्था परिवर्तनाचा आहे. सत्तेत परिवर्तन आले मात्र व्यवस्था तीच आहे. समता, बंधुत्व व न्याय असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्याकरिता सामाजिक परिवर्तनाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक अ‍ॅड. छन्ना जनबंधू, संचालन घनश्याम सरदारे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)