शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्त शाळेसाठी स्वत:पासून सुरुवात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचना व नऊ निकषांच्या आधारे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त झाल्या पाहिजे, यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व संबंधित सर्व घटकांनी तंबाखू व व्यसनमुक्तीसाठी स्वत:पासून सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा तंबाखू सल्लागार डाॅ. नंदू मेश्राम यांनी केले.

राष्ट्रीय तंबाखूनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत गटसाधन केंद्र गडचिराेलीच्या वतीने शुक्रवारी गडचिराेली व आरमाेरी तालुक्यातील सर्व शाळांचे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्तीवर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बाेलत हाेते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मीना दिवटे, मानसाेपचार तज्ज्ञ दिनेश खाेरगडे आदी उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. नंदू मेश्राम यांनी तंबाखू सेवनाचे शरीरावरील व आराेग्यावर हाेणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली. यावेळी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी व्यसनमुक्त शाळा, परिसर आदीबाबत माहिती देऊन ज्या गावात शाळा आहे ते संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. शाळा व परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी येणाऱ्या अडचणी काेणत्या, त्या कशा मार्गी लावता येईल, यावर चर्चा करण्यात आली.

संचालन मीना दिवटे यांनी केले. यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्राचे साधनव्यक्ती व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.