शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे आरक्षण केंद्रावरही दलालांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 18, 2014 00:12 IST

गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची

गडचिरोली : गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिरोली हा राज्यातील मागास व दुर्गम जिल्हा आहे. येथील नागरिकांना येथे आरक्षण तिकीट घेण्यासाठी चंद्रपूर किंवा वडसा येथे जावे लागत होते. येथील नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गडचिरोली येथे रेल्वे आरक्षण केंद्र देण्यात आले. येथून पुणे व मुंबई तसेच इतर ठिकाणसाठीच्या प्रवासाची तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिकीटचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची संख्याही वाढली आहे. २५ ते ३० वयोगटातील हे मुले १० ते १२ च्या संख्येने पहाटे ४ वाजतापासून रेल्वे आरक्षण केंद्रावर उपस्थित राहून एका कागदावर स्वत:चे नाव लिहून आपला रांगेत पहिला नंबर लावतात. त्यांचे एकमेकासोबत संगनमत असून आळीपाळीने तेच तिकीट काढतात. त्यांचे ओळखपत्र घेऊन तत्काळ तिकीटही ते मिळवितात. तिकीट देणारे रेल्वे कर्मचारी व दलाल यांच्यात वाटाघाटी असून दलालांकडून ठराविक रक्कम घेतली जाते. तिकीट देणारा रेल्वे कर्मचारी या दलालांना नावानिशी ओळखतो, अशी माहिती रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हा महासचिव विजय शेडमाके यांनी लोकमतला दिली आहे. या दलालांचे रोजचे काम असल्याने त्यांना कमी वेळात जास्तीतजास्त पैसे या कामात मिळतात. अन्य प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा वापरून ते गुंडागर्दीही येथे करीत असतात. एका कोऱ्या कागदावर स्वत:चे नाव लिहून प्रथम क्रमांक लावणाऱ्या या लोकांना कन्फर्म तिकीट दिले जाते. इतरांचा नंबर येईपर्यंत वेटींग तिकीट सुरू होते. या प्रकाराबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने दलालांचे फावत आहे व आरक्षण केंद्राचा सर्वसामान्य फायदा मिळणे कठीण झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)