शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 21, 2016 01:16 IST

स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी

निवेदन : एसटी बँक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणीगडचिरोली : स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेतर्फे गडचिरोली येथील विभागीय कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी १२ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. यातील दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्टेट ट्रॉन्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेला २०१५-१६ या वर्षात ११ कोटी ४२ लाख ९५ हजार ४५४ रूपयांचा नफा झाला होता. बँकेच्या संचालक मंडळाचा भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे यावर्षी लाभांश वाटप करण्यावर विदर्भ बँकेने निर्बंध घातले आहेत. बँकेच्या सभासदांना दरवर्षी १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा आहे. परंतु बँकेतील आंतर शाखा व्यवहाराचे समायोजन पूर्ण झाले नसून या खात्यामध्ये डेबीट बाजूस ८९.४९ कोटी रूपयांचा ताळमेळ अद्यापपर्यंत लागलेला नाही. तसेच बँकेच्या स्वारगेट, दापोडी, कोल्हापूर व मुंबई या शाखांसाठी रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग व्यवसाय करण्यासाठी परवाना घेतला नाही. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मंजूर करून देण्यात आलेल्या रोखपत मर्यादेसाठी रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घेतली नाही. या सर्व कारभाराची चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वर्कर्स काँग्रेस संघटनेने धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला गोंडवाना एसटी कामगार संघटनेनेही पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे विभागीय अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात इंटक संघटनेचे विभागीय सचिव लक्ष्मीकांत चौधरी, कार्याध्यक्ष सुनील खोब्रागडे, विलास भुरसे, राजू आखाडे, राजू चौधरी, जयंत तनगुलवार, मंगेश कुंभारे, शरद जांभुळकर, पवन वनकर, जे. टी. खोब्रागडे, किशोर लिंगलवार, विवेक फाये, अमित ठाकूर, विलास दुधे, सूर्यवंशी कुळमेथे, किशोर वानखेडे, ढोके, मडावी, अर्चना घडीकर, ताराबाई लेनगुरे, वंदना म्हस्के, गोंडवाना एसटी कामगार संघटनेचे महासचिव बंडू तिलगामे, विभागीय अध्यक्ष भास्कर आत्राम यांच्यासह इतर एसटी कामगार सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)