शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात विज्ञानासोबत अध्यात्माची जोड गरजेची

By admin | Updated: November 9, 2016 02:24 IST

मानवी जीवन हे धावपळीचे आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड ताण तणावाचा सामना करावा लागतो.

कुरखेडा येथे कार्यक्रम : कानिफनाथ महाराज यांचे प्रतिपादनकुरखेडा : मानवी जीवन हे धावपळीचे आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात प्रचंड ताण तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे मानवी मन विचलित होते. चित्त शांत ठेवण्यासाठी व सागरासारख्या अथांग मनावर ताबा मिळविण्यासाठी जीवनात विज्ञानासोबत अध्यात्माची जोड देणे गरजेचे आहे. अध्यात्म हा जीवन सुखकर करण्याचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांचे उत्तराधिकारी परमपुज्य कानिफनाथ महाराज यांनी केले.कुरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर मंगळवारी जगद्गुरू नरेद्रचार्य महाराज भक्तसेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रवचन, दर्शन व साधक दिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कानिफनाथ महाराज म्हणाले की, मानवाच्या जीवनात अनेक वाईट व्यसन ही फक्त मानवी शरीरालाच नाही तर मनाला व आत्मविश्वासालाही पोखरत असतात. त्यामुळे जीवनाची सुखशांती हिरावून जाते. मानवाने वाईट व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला खासदार नाना पटोले, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, विश्वहिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, ठाणेदार विलास सुपे, रामेश्वर काबरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगद्गुरू भक्तसेवा समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर कुथे, जिल्हा युवा अध्यक्ष क्रिष्णा खरकाडे, जिल्हा महिला अध्यक्ष कविता चिळंगे, सुरेश चिचघरे, सुनिल दुधबळे, सुरेश सहारे, यशवंत चौरीकर, शंकर कोंडावार, गोपी सुकारे, खोटोले, दाताळे, अनिता बोरकर, कुमार मोहने, चरण लांजेवार, श्रीहरी गायकवाड, मांडवे, मोहन कुथे, बाळकृष्ण तलमले, चहांदे, वट्टी, ब्राह्मणवाडे, पेंदाम, प्रेमा कोवे, रघुनाथ तुलावी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)२८० साधकांनी घेतली दीक्षा४० लोकांना साहित्य वितरणया कार्यक्रमात १० गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीन, २० जणांना स्प्रेपंप, १० जणांना ताडपत्री नि:शुल्क वितरित करण्यात आली. या कार्यक्रमात २८० साधकांनी कानिफनाथ महाराजांच्या हस्ते दिक्षा घेतली. या कार्यक्रमस्थळी नरेंद्रचार्य महाराजांच्या पादूका भक्ताच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.