शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जागा अडविली पण कामास सुरूवातच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:33 IST

गडचिरोली येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी १५ दिवसांपूर्वीच कंत्राटदाराने टीन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली. त्यामुळे बस थांबण्यासाठी तसेच प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : बसस्थानकाच्या नुतनीकरणास विलंब

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गडचिरोली येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी १५ दिवसांपूर्वीच कंत्राटदाराने टीन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली. त्यामुळे बस थांबण्यासाठी तसेच प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हामध्ये थांबून बसची वाट बघावी लागत आहे.गडचिरोली बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी एसटी महामंडळाने सुमारे तीन कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. नुतनीकरण करण्यासाठी कंत्राटदाराने १५ दिवसांपूर्वी बसस्थानक परिसरात टिन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली आहे. एसटीचा बाहेर निघणारा मार्ग सुध्दा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी बसेस बसस्थानकावर उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी बसेस बसस्थानक परिसरात उभ्या केल्या जात आहेत. प्रवाशांनाही पुरेशी जागा नाही. त्यामुळे मिळेल तेथे आडोशाला थांबावे लागत आहे. उन्हाळा सुरू झाला असल्याने दिवसा कडक ऊन पडत आहे. या उन्हातच प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. बांधकामाला तत्काळ सुरूवात करावी, अशी मागणी होत आहे.एसटी विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाच्या मागील बाजूस टिनाचे शेड उभारण्यास सुरूवात केले आहे. मात्र उन्हामुळे टिनांच्या शेडमध्ये प्रवाशी बसतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.बस शोधण्यासाठी प्रवाशांची धावपळमुख्य शहरांमध्ये जाणाऱ्या बसेस फलाटावर लागत होत्या. संबंधित गावाला जाणारे प्रवाशी त्या फलाटाजवळ थांबून बसची प्रतीक्षा करीत होते. तर ग्रामीण भागातील बसेस बसस्थानकाच्या समोर एका विशिष्ट जागेवर उभ्या ठेवल्या जात होत्या. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशी त्या जागेजवळ थांबत होते. आता मात्र बसची जागा बदलली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.असे राहणार नवीन बसस्थानकनवीन बसस्थानकात जुन्या बसस्थानकात सद्य:स्थितीत केवळ पाच फलाट आहेत. नवीन बसस्थानकात सुमारे १४ फलाट राहणार आहेत. जुन्या बसस्थानकाच्या इमारतीचा काही प्रमाणात विस्तार करून त्या ठिकाणी आठ फलाट बांधले जाणार आहेत. वर्कशॉपच्या बाजुने तीन फलाट व मुख्य मार्गाकडील बाजुने तीन फलाट असे एकूण १४ फलाट राहणार आहेत. तीन व्यावसायिक गाळे सुध्दा राहणार आहेत.बांधकामाला लवकरच सुरूवात होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्थानकाच्या मागच्या बाजुला टिनाचे शेड उभारले जात आहे. या ठिकाणी पंखा, ट्युब लाईट आदींची व्यवस्था केली जाणार आहे.- विनय गव्हाळे, विभागीय नियंत्रक, गडचिरोली