शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या समस्या मार्गी लावा

By admin | Updated: August 5, 2014 23:25 IST

गोंडवाना विद्यापीठ स्थापन होऊन तीन वर्ष पूर्ण झालीत. मात्र या विद्यापीठात अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. याचा फटका विद्यापीठातील ३४ महाविद्यालयांना बसत आहे.

३४ महाविद्यालयांना फटका : गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ स्थापन होऊन तीन वर्ष पूर्ण झालीत. मात्र या विद्यापीठात अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. याचा फटका विद्यापीठातील ३४ महाविद्यालयांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठाच्या समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ प्राचार्य फोरमनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेत माहिती देताना प्राचार्य फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. ए. शेख म्हणाले, शासनाने विद्यापीठात तत्काळ पूर्णवेळ कुलगुरूंची नियुक्ती करावी. विद्यापीठात विविध प्राधीकरणाचे तत्काळ गठण करण्यात यावे, राज्य शासनाने विद्यापीठाला इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, गोंडवाना विद्यापीठ २ एफमध्ये नसल्यामुळे या विद्यापीठातील अनेक महाविद्यालयांना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ (बी) अनुदानासाठी मान्यता दिली जात नाही. १२ बी अनुदानासाठी गोंडवाना विद्यापीठात किमान ५ स्वतंत्र पदव्युत्तर विभाग व या विभागात प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. मात्र स्वतंत्र विभाग नसल्याने याचा फटका इतर महाविद्यालयांना बसत आहे. त्यामुळे राज्य शासनाने गोंडवाना विद्यापीठात तत्काळ स्वतंत्र ५ पदव्युत्तर विभागाची नियुक्ती करावी, अशी मागणी प्राचार्य डॉ. शेख यांनी यावेळी केली. गोंडवाना विद्यापीठाने १२ बी अनुदानाचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दाखल केला आहे. मात्र सदर प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विद्यापीठांतर्गत ३० महाविद्यालयांना २ एफ १२ बी चे अनुदान आहे.मात्र विद्यापीठांतर्गत ३४ महाविद्यालय या अनुदानापासून वंचित आहेत. विद्यापीठ विभाजनाचा अनेक महाविद्यालयांना फटका बसला असल्याचेही फोरमच्या सदस्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री, प्राचार्य डॉ. हंसा तोमर, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य डॉ. बाळबुध्दे, प्राचार्य डॉ. साकोरे, प्राचार्य डॉ. कावळे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)