शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

समाज संघटन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:21 IST

शिंपी समाज अल्पसंख्य समाज असून या समाजाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत.

ठळक मुद्देअशोक आक्केवार यांचे प्रतिपादन : शिंपी समाजाची जिल्हास्तरीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शिंपी समाज अल्पसंख्य समाज असून या समाजाच्या समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. समाजातील समस्यांचे निराकरण करुन प्रगती साध्य करायची असेल तर ‘मन जोडो, समाज जोडो’ यानुसार समाज संघटन वाढविणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष अशोक आक्केवार यांनी केले.शिंपी समाजाच्या वतीने रविवारी स्थानिक संस्कृती सांस्कृतिक सभागृहात जिल्हास्तरीय पहिल्या शिंपी समाज परिषदचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष चंदू वडपल्लीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याध्यक्ष राजेश वडपल्लीवार, राज्य सरचिटणीस विजय आक्केवार, उपाध्यक्ष राजेश टापते, अ‍ॅड. राजेंद्र गटलेवार, संतोष शनगरवार, प्रशांत गटलेवार, दीपक कोटुरवार, प्रशांत राजूलवार, संदीप शिवरामवार, संजय सिंगेवार, अरविंद ओझलवार, प्रदीप कर्णेवार, जितेंद्र राणशिरवार, संजय दिकोंडवार, डॉ. दीपक कोटुरवार, आशिष मंथनवार, आशिष कनपूरवार, नामदेव गंदेवार, गणपत वडपल्लीवार, प्रशांत मुप्पीडवार, रवींद्र गंदेवार, दादाजी नंदगिरवार, श्यामसुुंदर आक्केवार भास्कर वडपल्लीवार आदी उपस्थित होते.शिंपी समाज परिषदेच्या उद्घाटनानंतर गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ‘शिंपी समाजाला संघटनाची कशी व का आवश्यता आहे’ यावर उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले. परिषदेच्या दुसºया सत्रात परिसंवादातून एलआयसीचे शाखा व्यवस्थापक सुधीर रामगिरवार यांनी समाज संघटनेस प्रत्येकाने सहकार्य करुन समाजातील विस्कटलेली घडी रूळावर आणण्यासाठी राज्य संघटनेस पाठींबा दर्शवावा, असे विचार व्यक्त केले. प्रा. रमेश मुनगंटीवार यांनी ध्येयपूर्ण कृतिशील नेतृत्व व सर्जनशील मार्गदर्शकाची गरज असून भविष्याचा वेध घेत समाजाला योग्य दिशा देण्यासाठी समाज संघटन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, नयना वडपल्लीवार तर आभार प्रवीण रामगिरवार यांनी मानले.