शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

वेबसाईट अद्ययावत करण्यास सामाजिक न्याय विभागाची टाळाटाळ

By admin | Updated: January 10, 2015 22:55 IST

सामाजिक न्याय विभागाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाच्या फ्रीशिपचे अर्ज भरण्याठी असलेली वेबसाईट अद्यावत केलेली नसल्याने लिंक राहत नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत

गडचिरोली : सामाजिक न्याय विभागाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व राज्य शासनाच्या फ्रीशिपचे अर्ज भरण्याठी असलेली वेबसाईट अद्यावत केलेली नसल्याने लिंक राहत नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी संगणक केंद्रावर विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत. या प्रकाराला सामाजिक न्याय विभाग जबाबदार असल्याचा आरोप ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी केला आहे.चार वर्षांचा कालावधी लोटूनही शिष्यवृत्तीचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले नाही. त्यामुळे ही वेबसाईट अत्यंत हळूवार चालते. कधीकधी चार ते पाच दिवस लिंकच राहत नाही. खेड्यातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालय सोडून शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी दिवसभर संगणक केंद्रावर ताटकळत बसतात. मात्र वेबसाईट सुरू होत नाही. शेवटी निराश होऊन विद्यार्थ्यांना परत जावे लागते. शहरातील काही मोजक्या विद्यार्थ्यांचा रात्री क्रमांक लागतो. यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. वेबसाईट अपडेट करण्याविषयी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उदासीन आहे. शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर होती. मात्र ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून झाले नसल्याने १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आता केवळ पाच दिवस शिल्लक आहेत. मात्र वेबसाईटची लिंक राहत नसल्याने या कालावधीतही पूर्ण विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून होतील काय, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा शासन निर्णय संदिग्ध असल्याने याचा लाभ देण्यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी तयार होत नाही, असे येलेकर यांनी म्हटले आहे.