शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीतील ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:35 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती घाटाच्या परिसरात धाड टाकून दोटकुली साझाच्या तलाठ्यांनी रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला तर संबंधित ट्रॅक्टर मालकाला....

ठळक मुद्देवाघोली रेती घाटावर कारवाई : १ लाख १३ हजारांचा दंड ठोठावला

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती घाटाच्या परिसरात धाड टाकून दोटकुली साझाच्या तलाठ्यांनी रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला तर संबंधित ट्रॅक्टर मालकाला कायद्यान्वये १ लाख १३ हजार ३०० रूपयांचा दंड ठोठावला. सदर कारवाई २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.एमएच ३३ एफ १३९९ क्रमांकाचा ट्रॅक्टर वाघोली घाटावरून रेती भरून दोडकुली गावाच्या रस्त्याकडे येत होता. दरम्यान दोटकुलीचे तलाठी एन. एच. चंदनखेडे यांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर अडविला. चालकाकडून टीपीची चौकशी केली असता, ट्रॅक्टर चालक पंकज दशरथ पोरटे यांनी टीपीवर खोडतोड केली असल्याचे दिसून आले. यावरून अवैधरित्या रेतीची तस्करी होत असल्याचे आढळून आले. कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्यास सांगितले. दरम्यान चालकाने आपल्या मनमर्जीने ट्रालीमधील रेती खाली केली व ट्रॅक्टर घेऊन घराकडे निघाला. ही बाब माहित होताच तलाठ्यांनी नायब तहसीलदार तनगुलवार यांना सांगितले. तनगुलवार यांनी तहसीलदार येरचे यांच्या मार्गदर्शनात सदर ट्रॅक्टर जप्त केला. ट्रॅक्टर मालकावर महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियमान्वये १ लाख १३ हजार रूपयांचा दंड ठोठावला.रेती तस्करी वाढतीवरचामोर्शी तालुक्याच्या वाघोली रेती घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. मात्र या घाटावरून रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ट्रॅक्टर मालक, चालक प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नायब तहसीलदारांनी तस्करीतील ट्रॅक्टर मालक धनराज नरूले यांना दंड भरण्याचा पत्र पाठविले आहे.