शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कर्जवाटपाचा वेग मंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:51 IST

जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत यश आले आहे.

ठळक मुद्देअवघे ३६ टक्के वाटप : जिल्हा बँकेने मात्र गाठले ७२ टक्के उद्दीष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत यश आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र कर्जवाटपात पुढे असून या बँकेने ७२ टक्के लक्ष्य गाठले आहे.गेल्या १५ दिवसांपासून रोवणीची कामे सुरू आहेत. गेल्या रविवार आणि सोमवारच्या पावसानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला. मात्र मजुरीचे दर, खताच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे. हाती पैसा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामेही खोळंबली आहेत. बँकेत सध्या शेतकऱ्यांची गर्दी जास्त आहे. पण राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जवाटपात आखडता हात घेत आहेत.राष्ट्रीयकृत बँकांना यावर्षी खरीप हंगामासाठी १११ कोटी ६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत या बँकांनी ४ हजार ३८४ शेतकऱ्यांना २४ कोटी ४० लाखांचे कर्जवाटप केले. उद्दीष्टाच्या तुलनेत हे कर्जवाटप अवघे २२ टक्के आहे. अ‍ॅक्सिस आणि आयसीआयसीआय या दोन्ही खासगी बँकांच्या कर्जवाटपाची स्थिती तर आणखीच बिकट आहे. त्यांनी ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या उद्दीष्टापैकी केवळ ९ शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ३१ कोटी ८० लाख रुपयांच्या उद्दीष्टापैकी ८ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र सहकार विभागाची लाज राखली आहे. त्यांनी ५६ कोटी ९ लाख रुपयांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ४० कोटी ३३ लाख रुपये कर्ज वाटून ७२ टक्के उद्दीष्ट गाठले आहे. या बँकेने सर्वाधिक १२ हजार १९९ शेतकऱ्यांना कर्ज दिले.अशा पद्धतीने जिल्हाभरात आतापर्यंत सर्व बँकांमिळून अवघ्या १७ हजार ७७० शेतकऱ्यांना ७३ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. पुढील काही दिवसात जिल्हा बँक कर्जवाटपाचे उद्दीष्ट ओलांडू शकेल. मात्र इतर बँका दिलेले उद्दीष्टही गाठू शकेल किंवा नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.२३ टक्क्यांवर धानाची रोवणी आटोपलीमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. सतत पाऊस असल्याने रोवणीच्या कामांमध्ये सातत्य आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५१ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ११ हजार ६२३ हेक्टरवर रोवणीची कामे तर २२ हजार ८७४ हेक्टरवर आवत्या, पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. याची टक्केवारी २३ टक्के एवढी आहे. सतत पाऊस पडत असल्याने वातवरणामध्ये गारवा आहे. त्यामुळे अपवाद वगळता पिकांवर किडीचा प्रादुर्भाव नाही. पाऊस सुरूच राहिल्यास पुढील १५ दिवसांत रोवणीची कामे आटोपण्याचा अंदाज आहे.खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरूकाही शेतकरी धानाच्या रोवणीच्या वेळीच खत टाकतात. तर काही शेतकरी रोवणा पूर्ण झाल्यावर खत टाकतात. रोवणीची कामे सुरू असल्याने खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील खत विक्रेत्यांकडे पुरेसे खत उपलब्ध आहे. त्याचबरोबर पॉस मशीनच्या सहाय्याने खत खरेदी करायचे असल्याने खते विक्रेत्यांकडून होणारी लुबाडणूक बंद झाली आहे.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज