शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा तालुक्याला होणार तेलंगणा राज्यातून वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

सिरोंचा येथील ६६ केव्हीचे सब स्टेशन वाढवून ते १३२ केव्हीचे केले जात आहे. या पद्धतीने तेलंगणातून वीजपुरवठा घेऊन तालुक्याची वीज समस्या दूर करावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. तेलंगणातील रामगुंडम येथील ४००० मेगावॅटच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून किष्टमपेठच्या १३२ केव्ही सब स्टेशनला वीजपुरवठा होतो. तेथून तो आता सिरोंचापर्यंत लांबवला जात आहे. 

ठळक मुद्देसमस्या सुटणार, १३२ केव्हीच्या नवीन सबस्टेशनचे काम सुरू

कौसर खान लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : चंद्रपूरच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून आतापर्यंत सिरोंचा तालुक्याला होत असलेल्या वीजपुरवठ्यात अनेक अडचणी येत होत्या. मध्ये लागणाऱ्या जंगलाच्या भागामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असे; पण आता ही समस्या कायमची दूर होणार आहे. चक्क तेलंगणा राज्याच्या सरकारी वीज कंपनीमार्फत आता तालुक्याला वीजपुरवठा केला जाणार असून त्याची तयारी जोमाने सुरू आहे. सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या आणि सिरोंचापासून २२ किलोमीटरवर असलेल्या किष्टमपेठ येथील १३२ किलोवॅट सब स्टेशनवरून सिरोंचाला वीजपुरवठा घेतला जाणार आहे. त्यासाठी सिरोंचा येथील ६६ केव्हीचे सब स्टेशन वाढवून ते १३२ केव्हीचे केले जात आहे. या पद्धतीने तेलंगणातून वीजपुरवठा घेऊन तालुक्याची वीज समस्या दूर करावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. तेलंगणातील रामगुंडम येथील ४००० मेगावॅटच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रातून किष्टमपेठच्या १३२ केव्ही सब स्टेशनला वीजपुरवठा होतो. तेथून तो आता सिरोंचापर्यंत लांबवला जात आहे. किष्टमपेठ व सिरोंचा सबस्टेशन जोडल्यानंतर तालुक्यातील रेगुंठा, झिंगानूर येथेही छोटे सबस्टेशन होणार असून प्रत्येक गावांत घरगुती आणि शेतीच्या वापरासाठी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. 

जंगलामुळे वीजपुरवठ्यात अडथळा सध्या आष्टी-आलापल्ली या मार्गाने सिरोंचा तालुक्याला वीजपुरवठा होतो. मार्गात घनदाट जंगल असल्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्याने झाड पडून किंवा एकमेकांना स्पर्शून वीजपुरवठा खंडित होतो. याशिवाय पुराच्या पाण्यात सिरोंचाजवळील विद्युत खांब पाण्यात बुडून वीजपुरवठा बंद होतो. ही समस्या आता दूर होणार आहे.

किष्टमपेठ ते सिरोंचा यादरम्यान वीज वाहून आणण्यासाठी ११३ टॉवरच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. याशिवाय अजून लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहणही सुरू आहे. या कामानंतर आलापल्लीवरून विद्युत पुरवठा खंडित झाला तरी तेलंगणातून तो सुरू राहणार आहे. 

 

टॅग्स :electricityवीजTelanganaतेलंगणा