शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

साहेब आमच्याकडे लक्ष द्या हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

कोरची : तालुका मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला टेकामेटा हा गाव आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्र असून, ...

कोरची : तालुका मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेला टेकामेटा हा गाव आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्र असून, विकासापासून कोसो दूर आहे. या गावात जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही. गावाला किमान रस्ता देण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून हाेत आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही कोरची तालुक्यात काही अशी गावे आहेत, की त्याठिकाणी जाण्यासाठी कच्चे व पक्के रस्ते नाहीत. त्यापैकी टेकामेटा हे एक गाव असून, या गावात जाण्यासाठी आजही पायवाटेनेच जावे लागते.

येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, निवडणुकीच्या वेळेस अनेक राजकीय पुढारी येतात, आश्वासने देऊन जातात व निवडणूक संपल्यानंतर कोणीही समस्या दूर करण्यासाठी येत नाहीत. टेकामेटा हा गाव ग्रामपंचायत मोठा झेलियामध्ये आहे. या गावात एकूण वीस ते पंचवीस घरे आहेत. चारही बाजूनी जंगल आहे. गावालगत दाेन नाले असून, या नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात गावातून बाहेर पडण्यासाठी मार्गच उरत नाही. दोन ते तीन महिने बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटतो. अशावेळी एखाद्या व्यक्तीची तब्बेत बिघडल्याने औषधोपचारासाठी व गर्भवती महिलांना दवाखान्यात प्रसुतीसाठी जाण्यास अनेक अडचणींना समोरे जावे लागते आणि वेळप्रसंगी जीवही गमवावा लागतो.

मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दळणवळण. पक्क्या रस्त्याने गावांना जोडले गेले पाहिजे. खरं म्हणजे मुख्य रस्त्यापासून ते तुळमुळापर्यंत कच्चा रस्ता आहे. पण तिथून टेकामेटाला जाण्यासाठी रस्ताच नाही. म्हणून शासन व प्रशासनाने तेथील लोकांच्या समस्या अग्रक्रमाने घेऊन रस्ता व पूल मंजूर करुन त्यांना मुख्य प्रवाहात जोडून त्यांचे जीवनमान उंचवावे, अशी मागणी या गावातील ग्रामस्थांबरोबरच माजी सरपंच गिरीजा कोरेटी यांनी केली आहे.