शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

झाडीपट्टी रंगभूमीने आता सोशल साईटवर कोरले नाव!

By admin | Updated: November 22, 2015 01:35 IST

झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर आपले स्वत:चे फेसबुक खाते उघडून ...

नाट्य प्रयोगांची धूम : झाडीपट्टी कलेचा आॅनलाईन प्रचार सुरूविसोरा : झाडीपट्टी रंगभूमीतील नाटक कंपन्यांनी आता फेसबुक सारख्या समाजमाध्यमांवर आपले स्वत:चे फेसबुक खाते उघडून त्यावरुन आपल्या कंपनीतील नाटकांचे पोस्टर आॅनलाईन पोस्ट करीत आहेत. सदर पोस्ट सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसारित होते. म्हणजेच झाडीची नाटक झाडीपट्टीच्या सीमा पार करुन ग्लोबल झाली आहे. यातून नाटक कंपन्यांनी नाटकांचा आॅनलाईन प्रचार व प्रसार करुन झाडीपट्टी रंगभुमीच्या इतिहासात सोनेरी पान लिहिले आहे.कवी कुलगुरु कालिदास यांनी ज्या भूमीचा उल्लेख ‘सौराज्य रम्य’ अशा सार्थ शब्दात केला ती झाडी म्हणजे आजच्या महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा कोपरा होय. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या चार जिल्ह्यांचा अंतर्भाव झाडीपट्टीत करता येतो. या झाडीच्या पट्ट्यात बोलली जाणारी बोलीभाषा म्हणजे झाडीबोली. या चार जिल्ह्यांच्या विस्तीर्ण अशा भूभागावर पसरलेल्या हिरव्यागार घनदाट वनराईमुळे हा भाग झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो.झाडीपट्टी रंगभुमीला १०० पेक्षा जास्त वर्षांची समृद्ध अशी परंपरा आहे. १९व्या शतकाचा शेवट आणि विसाव्या शतकाचा प्रारंभ काळ म्हणजे संशोधनांच्या संक्रमणाचा होता. त्यावेळी झाडीपट्टीच्या प्रदेशात दळणवळणाची आणि मनोरंजनाची आजच्यासारखी अति वेगवान संपर्काची साधने नव्हती. परिणामी येथील नागरिकांना स्वत:च्या अंगभूत कलाकौशल्यातूनच परस्परांचे मनोरंजन करावे लागत असे. झाडीपट्टीतील खेड्यांमध्ये इंग्रज कालखंडात देशमुख, मालगुजार, जमीनदार, पाटील यांनी दंडार, नाट्य आणि संगीत नाटकांना आश्रय दिला. चांगले कलावंत, संगीतकार, वाद्यवृंदवादक यांना हेरून त्यांना बाहेरुण आणून जमीन व घरे दिली. दंडार वा संगीत नाटक यांचे आयोजन पैशाचा विचार न करता फक्त मनोरंजन म्हणून केल्या जात असे. दंडारनाट्यात पौराणिक कथांचे प्रतिबिंब तर नाटक प्राचीन धार्मिक, आध्यात्मिक कथानकांवर आधारित असत. झाडीच्या प्रदेशात गावोगावी होळी, दिवाळी, दसरा सणांना वा विशिष्ट दिनी दंडार व नाटकांचे प्रयोग होत असत. परंतु दंडार व नाटक प्रयोग करायचा असल्यास कथानक, कलाकार, नेपथ्थ, सिनसिनेरी, वाद्यवृंदवादक, पार्श्वगायकाची गरज असते.१०० वर्षांपूर्वी हे सर्वजण एकाच वेळेस, एकाच छताखाली उपलब्ध होणे अशक्यप्राय होते कारण आजच्यासारखी तेव्हा दळणवळण, संपर्क, प्रचार (पत्रके) साधने नव्हती. अशावेळेस गावी आलेले पाहुणेमंडळी स्वगावी गेल्यानंतर पाहिलेल्या दंडार वा नाटकांचे आयोजन अनुकरणातून करीत म्हणजे प्रेक्षकांकडूनच दंडार, नाटक प्रयोगांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या प्रचार व प्रसार असे दोन्ही काम होत असे. (वार्ताहर)पत्रकांतूनही ग्रामीण भागात प्रचार मोहीममुद्रणयंत्राचे आगमन झाल्यानंतर ज्या गावी नाट्यप्रयोग असेल तेथील आयोजक पत्रक छापून त्या गावाच्या परिसरात पायी, खासराने फिरून नाटकांचे प्रचार करीत. रस्त्यांच्या सुविधा झाल्यावर दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापराने तेच काम होऊ लागले. आताच्या तंत्रयंत्र युगात आधीसारखे जुळवाजुळव करावे लागत नाही कारण नाटक कंपनी त्या सर्व सोईसुविधा देते. आता सोशल साईटवर नाट्य प्रयोगाचा प्रचार होत असला तरी गावकरी पत्रके खेडोपाडी चिपकवतातच.