शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

शॉर्टसर्किटने कारला आग

By admin | Updated: April 22, 2017 01:26 IST

चंद्रपूर येथून लग्न समारंभाकरिता सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला

संड्रा गावाजवळील घटना : लग्न समारंभासाठी आले होते युवक अहेरी : चंद्रपूर येथून लग्न समारंभाकरिता सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथे जाण्यासाठी निघालेल्या युवकांच्या कारला आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील संड्रा गावाजवळ गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत वाहन जळून खाक झाले; मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंद्रपूर येथून चार युवक रंगयापल्ली येथे लग्न समारंभाकरिता कारने आले होते. या युवकांनी दारूच्या शोधात आलापल्लीपासून २५ किमी अंतरावरील गुड्डीगुडम गाव गाठले. या ठिकाणी दारू मिळते काय? याबाबत नागरिकांकडून जाणून घेतले. त्यानंतर या युवकांनी इंदाराम, गेर्रा या गावात जाऊन दारू घेतली. बिअरच्या बॉटलही सोबत घेऊन ते रंगयापल्लीकडे निघाले. संड्रा गावापासून तीन किमी अंतरावर भर जंगलात कारने पेट घेतला. समयसुचकता दाखवित वाहन थांबवून युवकांनी कारमधून स्वत:ची सुटका करून घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याच युवकांनी संड्रा गावातनू पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अगदी पाच मिनिटातच आगीचे डोंब उसाळायला सुरूवात झाली. आग विझविण्याचा प्रयत्न करतानाच वाहनचालकाच्या हाताला जखम झाली आहे. कार जळाल्यानंतर चारही युवकांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. (प्रतिनिधी) यावर्षी कार जळाल्याची तिसरी घटना कार जळाल्याची जिल्ह्यातील यावर्षीच्या उन्हाळ्यातील ही तिसरी घटना आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात अ‍ॅड. लिलाधर कुंभारे यांची तर त्यानंतर जिल्हा परिषदेत मुलचेरा येथील नागरिकाची कार जळाली होती. त्यानंतर आता ही तिसरी कार जळाली आहे.