शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये तिप्पट दराने खरेदी

By admin | Updated: January 13, 2015 22:59 IST

१३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानांतर्गत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे ई- निविदा प्रक्रिया राबवून जिल्हा परिषद प्रशासनाने पाच पुरवठादारांना दिले आहे.

चौकशीची मागणी : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पाच पुरवठादारांवरच मेहरबानगडचिरोली : १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानांतर्गत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे ई- निविदा प्रक्रिया राबवून जिल्हा परिषद प्रशासनाने पाच पुरवठादारांना दिले आहे. सदर पुरवठादार बाजार भावापेक्षा तिप्पट दराने जिल्हा परिषदेला शैक्षणिक साहित्य पुरवठा करण्याच्या तयारीत लागले आहेत. मागील पाच-सहा वर्षांपासून याच पुरवठादारांवर जिल्हा परिषद प्रशासन मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. बाजार भावापेक्षा जादा दराने या साहित्याची खरेदी जि. प. करीत असल्याने जिल्हा परिषदेलाही प्रचंड आर्थिक फटका यात बसत आहे. मात्र अधिकाऱ्यांशी पुरवठादारांची मिलीभगत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यास प्रचंड टाळाटाळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचा आरोप निविदा नाकारण्यात आलेल्या कंत्राटदारांनी केला आहे. अहेरी येथील सिद्धीविनायक ट्रेडर्सला स्कूल बॅग पुरवठ्याचे काम देण्यात आले आहे. बालाजी बायडिंग वर्क्स नागपूर यांना शिक्षक हजेरी व चेक रजिस्टर, बी. के. ट्रेडर्स नागपूरला नोटबुक व ड्रार्इंग वही पुरवठ्याचे काम देण्यात आले आहे. तर शिव प्रिन्टर्स गडचिरोलीला स्टेशनरीचे पाच साहित्य पुरविण्याचे सर्वात मोठे काम देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी संचयी नोंदपत्रक, विद्यार्थी संचयी फाईल, आकस्मिक मूल्यमापन वर्तनात्मक नोंदवही, सातत्यपूर्व सर्वमूल्यमापन पुस्तिका, प्रकल्प व कार्यलेखन पुस्तिका, तसेच संतोष एंटरप्राईजेसला रंगकांडी व बॉटल बॉक्स पुरवठ्याचे काम देण्यात आले आहे. हा पुरवठा १५ लाखापर्यंत केला जाणार आहे. जी स्कूलबॅग बाजारात १२० ते १२५ रूपयाला मिळते ती बॅग हे पुरवठादार जिल्हा परिषदेला २२५ रूपयात तर ३८ ते ४० रूपयाला बाजारात असलेली शिक्षक हजेरी व चेक रजिस्टर ५३ रूपयाला पुरवठा केली जाणार आहे. तसेच १४ रूपयाला मिळणारे नोटबुक २७ रूपयाला तर १८ रूपयाला मिळणारी ड्रार्इंगवही ४५.५० रूपयाला पुरवठा केली जाणार आहे. विद्यार्थी संचयी नोंद पत्रक हे ८ ते १० रूपयाला असताना त्याची किंमत पुरवठादाराने ३५ रूपये दाखविली आहे. विद्यार्थी संचयी फाईल जी ७ ते ८ रूपयाला बाजारात मिळते ती २५ रूपयाला जिल्हा परिषदेला पुरवठा केली जाणार आहे. याशिवाय आकस्मिक मूल्यमापन वर्तनात्मक नोंदवही ३० रूपयाला बाजारात उपलब्ध आहे. ती ९५ रूपये दराने जिल्हा परिषदेला दिली जाणार आहे. तसेच सातत्यूपूर्व सर्वमूल्यमापन पुस्तिका ३० ते ३५ रूपयाची मिळत असताना ९५ रूपये दराने जिल्हा परिषद याचीही खरेदी याच पुरवठादाराकडून करीत आहे. प्रकल्प व कार्यलेख पुस्तिका ५ रूपयाला बाजारात मिळते. ती २५ रूपयाला पुरवठा करण्यात येत आहे. रंगकांडी १० रूपयाला तर बॉटलबॉक्स २५ रूपयाला मिळत असतांना पुरवठादार अनुक्रमे २० व ४५.७५ रूपयाला हे साहित्य जिल्हा परिषदेला पुरविणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)