शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुकान गाळे व मोबाईल टॉवर सील

By admin | Updated: March 23, 2017 00:54 IST

देसाईगंज नगर पालिका प्रशासनाने मालमत्ता व पाणी कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे.

साडेपाच लाख रूपये जमा : कर वसुलीसाठी देसाईगंज पालिकेची धडक मोहीमदेसाईगंज : देसाईगंज नगर पालिका प्रशासनाने मालमत्ता व पाणी कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून बुधवारी थकबाकी असलेल्या करदात्यांचे नगर परिषद कॉम्प्लेक्समधील एक दुकान गाळे तसेच एक मोबाईल टॉवर सील केल्याची कारवाई करण्यात आली.पालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांच्या नेतृत्वात कर निरीक्षक एस. व्ही. नगराळे, बांधकाम अभियंता अनिल दाते, मुख्य लिपीक दा. रा. ढोंगे, लेखापाल भुर्रे, पाणी पुरवठा अभियंता विरेंद्र ढोके, नितीन गोरखेडे यांनी बुधवारी कर वसुलीची धडक मोहीम राबविली. सर्व वॉर्डात लाऊंडस्पिकरद्वारे जाहीर मुनादी देण्यात आली. तसेच पालिकेच्या नोटीस फलकावर थकबाकीदाराचे नाव प्रसिद्ध करण्यात आले. या धडक मोहिमेदरम्यान १ लाख ५० हजार रूपयांची मालमत्ता कर, ३ लाख ५० हजार रूपयांचे खोली भाडे, पाणीपट्टी करापोटी ६४ हजार ९३० असा एकूण ५ लाख ६४ हजार ९३० रूपये पालिका प्रशासनाने वसूल केले.थकबाकीदारांनी मालमत्ता व पाणी कराचा वेळेच्या आत भरणा न केल्यास यापुढे जप्तीची कार्यवाही सुरूच राहणार, अशी माहिती मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांनी दिली आहे. ३१ मार्चपूर्वी १०० टक्के कर वसुली करण्यासाठी देसाईगंज नगर पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. कर वसुली पथक वॉर्डावॉर्डात फिरत आहे. कर भरण्याचे आवाहनही केले जात आहे. (वार्ताहर)