शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

शोभायात्रेने चामोर्शी नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:10 IST

श्री संप्रदाय भक्त सेवा समिती गडचिरोली तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने गुढीपाडवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे चामोर्शी नगरी दुमदुमली.

ठळक मुद्देगुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम : श्री संप्रदाय भक्त सेवा समितीचा पुढाकार

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : श्री संप्रदाय भक्त सेवा समिती गडचिरोली तालुका शाखा चामोर्शीच्या वतीने गुढीपाडवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे चामोर्शी नगरी दुमदुमली.शोभायात्रा काढण्यापूर्वी सकाळी ९ वाजता आॅनलाईन महासत्संग कार्यक्रम घेण्यात आला. १२ वाजता सांस्कृतिक भवन बाजार चौकातून मुख्य बाजारपेठ मार्गे वाळवंटी चौक, मार्र्कंड मोहला, माता मंदिर, राम मंदिर, चवडेश्वरी मंदिर, लक्ष्मी गेट, बसस्थानक, जोशी पेट्रोलपंप, हनुमान नगर मार्गे शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत कलशधारी महिला व गुढीधारी महिला रथावर विराजमान झालेली झाकी काढण्यात आली. महिलांची कलश यात्राही निघाली. त्याचबरोबर आदिवासी नृत्य, खांद्यावर केशरी ध्वज घेतलेले महिला व पुरूष ‘गुरूमाऊली नरेंद्रस्वामी जय जय योगीया’ असा गजर करीत होते.शोभायात्रेत आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, जिल्हा अध्यक्ष किशोर कुथे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबाराव तरासे, जिल्हा कमांडर सुरेश चिचघरे, तालुका अध्यक्ष रमेश बारसागडे, कविता चिळंगे, भारती तरासे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, आनंद गण्यारपवार, राजेश बाळराजे, जिल्हा निरिक्षक ताराचंद शेळके, विनोद खोबे, क्रिष्णा खरकाटे, रामकृष्ण तामशेट्टीवार, घनश्याम फुलकंवर, किशोर कुमरे, बाळू गुरफुले, पुरूषोत्तम कामठे, सुरेश सहारे, दिलीप मांदाडे, संतोष लोणारे, सत्तू सातपुते, सुनील देशमुख, तुळशीदास कुत्तरमारे, वनिता खरवडे, जयप्रकाश हर्षे, संगीता हर्षे, मदन राजुरकर, विजय खरवडे, लोमेश बुरांडे, प्रदीप वानखेडे, प्रमोद दुधबळे, रवी आक्केवार, सुनील दुधबळे, पुनेश वासेकर, अशोक भांडेकर, दिलीप कोठारे, बंडूजी चलाख, पुरूषोत्तम भांडेकर, गुरूदास गुरनुले, गजानन पिपरे, प्रेमिला काटींगे, मुक्तेश्वर अनंतरवार, गजानन देवतळे, रंजना दुधबळे यांच्यासह शेकडो गुरूबंधू व गुरूभगिनी सहभागी झाले होते.दुपारी ३.३० वाजता शोभायात्रा बाजार चौकातील सांस्कृतिक भवनात पोहोचली. या ठिकाणी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांची आरती करण्यात आली. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संप्रदायचे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व चामोर्शी येथील नागरिकांनी सहकार्य केले.झांकी ठरले आकर्षणअहेरी तालुक्यातर्फे शिवाजी महाराज, झांशीची राणी, संत गाडगेबाबा यांची झाकी तयार केली होती. गडचिरोली तालुकातर्फे राम-सीता-लक्ष्मण, हनुमान, आरमोरी तालुक्यातर्फे गजानन महाराज, देसाईगंज तालुक्यातर्फे शिवाजी महाराज, चामोर्शी तालुकातर्फे कलशधारी व गुढीधारी महिलांची झाकी होती. गोंडी नृत्य, ढोल ताशेही आकर्षण ठरले.