शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

कोरची व देसाईगंजचे शिवसेना पदाधिकारी भाजपाच्या तंबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:47 IST

स्थानिक राजीव भवनात मंगळवारी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात कोरचीचे नगर पंचायत अध्यक्ष नसरूद्धीन भामानी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोरची तालुक्यातून शिवसेनेचा सफाया झाला आहे.

ठळक मुद्देआमदार, खासदारांची उपस्थिती : नगर पंचायत अध्यक्षासह अनेक नगरसेवक व सरपंचांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची/देसाईगंज : स्थानिक राजीव भवनात मंगळवारी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात कोरचीचे नगर पंचायत अध्यक्ष नसरूद्धीन भामानी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोरची तालुक्यातून शिवसेनेचा सफाया झाला आहे.पंडित दीनदयाल उपाध्याय विस्तार योजनेअंतर्गत भाजपतर्फे देशभर पक्ष विस्तार उपक्रम राबविला जात आहे. याच योजनेअंतर्गत कोरची येथे मंगळवारी कार्यक्रम पार पडला. मात्र यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी राडा घातल्याने कार्यक्रम प्रभावित झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते होते. यावेळी मंचावर आ. कृष्णा गजबे, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, किसन नागदेवे, प्रकाश पोरेड्डीवार, जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, मोती कुकरेजा, कोरची तालुका प्रभारी विलास गावंडे, रमाकांत ठेंगरी, रवींद्र ओल्लालवार, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, राजू जेठानी, श्याम उईके, विरेंद्र अंजनकर, गोपाल उईके, नंदू पेट्टेवार, खेमराज डोंगरवार, चांगदेव फाये, अ‍ॅड. उमेश वालदे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष नसरूद्धीन भामानी, माजी जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांच्यासह कोरचीचे सहा नगरसेवक, चार सरपंच व दोन उपसरपंच तसेच इतर शिवसेना कार्यकर्त्यांचा समावेश आहे. देसाईगंजचे शिवसेना शहर अध्यक्ष, वानखेडे यांनीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.याप्रसंगी नसरूद्धीन भामानी यांच्या पक्ष प्रवेशाने भाजपला फायदा होईल, असे प्रकाश पोरेड्डीवार यांनी सांगितले. यावेळी किसन नागदेवे यांनी मार्गदर्शन केले. आ. कृष्णा गजबे म्हणाले, ‘एक बुथ २५ युथ’ ही संकल्पना डोळ्यासमोरी ठेवून पक्ष विस्तार करण्याचे काम सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक योजना तळागळातील लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोेचवावेत, राजीव भवनाचा विकास करू, कोरची-बेतकाठीचा रस्ता तयार झाला असून बोटेकसा व कोटगूल या मार्गाच्या कामाचे टेंडर निघाले आहेत. लवकरच या तालुक्यात पक्के रस्ते होतील, असे सांगितले. कोरची नगर पंचायतीला विकासासाठी दोन कोटी रूपयांचा निधी दिल्याचे आ. गजबे यांनी यावेळी सांगितले. नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्या कर्तव्यानुसार पद दिले जाईल, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.देसाईगंजमध्ये सेनेला खिंडारदेसाईगंज तालुक्यात अलिकडे झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला सपाटून हार सहन करावी लागली. त्यातून सावरण्याच्या आत आता सेनेचे शहर प्रमुख सचिन वानखेडे यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह भाजपात प्रवेश केल्याने सेनेला मोठा धक्का बसला आहे.कोरची येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यात शहर प्रमुख सचिन वानखेडेसह जगन्नाथ फडणवीस, कैलास वानखेडे, गोवर्धन नंदापुरे, कृष्णा मेश्राम, रामचंद्र मोहुलें, विपुल ढोरे, अक्षय साखरकर, दिगंबर मेश्राम, दुधराम हषें, खुशाल दोनाडकर, गजानन मारबते, गजानन सहारे, राजकुमार बागडे, धनराज चंदनखेडे, मोहन कनोजिया, वासुदेव मेश्राम, शामराव मारबते आदी प्रमुख कार्यकत्यांचा समावेश आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात राडाकार्यक्रम सुरू असताना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी शेकडो विद्यार्थ्यांसह कार्यक्रमस्थळी पोहोचले. १२ सप्टेंबर रोजी कोरची शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया मुख्याध्यापक, डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.