शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

लाइक, शेअर, फाॅरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते जेलची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:42 IST

इंटरनेट स्वस्त झाल्यापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेला मजकूर खरा की खाेटा, हे तपासण्याची काेणतीही यंत्रणा नाही. ...

इंटरनेट स्वस्त झाल्यापासून समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेला मजकूर खरा की खाेटा, हे तपासण्याची काेणतीही यंत्रणा नाही. कधी- कधी दाेन समाजात तेढ निर्माण हाेईल, असे लिखाण केले जाते, तर कधी- कधी एखादी संस्था, नागरिक यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने मजकूर तयार करून टाकला जातो. या मजकुराची काेणतीही शहानिशा न करता ताे काही नागरिकांकडून फाॅरवर्ड केला जाते. या मजकुराच्या माध्यमातून ज्याची बदनामी झाली आहे. अशा व्यक्ती याबाबत पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार करते. सायबर विभागामार्फत याची तपासणी करून मजकूर निर्माण करणाऱ्याचा, तसेच ताे शेअर करणाऱ्याचा शाेध घेतला जाते. त्यांच्या विराेधात गुन्हा दाखल केला जाते. वेळप्रसंगी जेलची हवाही खावी लागते.

बाॅक्स

सायबर विभागाकडे वर्षभरात

जवळपास १०० तक्रारी

साेशल मीडियाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र सायबर सेल कार्यरत आहे. या विभागाकडे वर्षभरात जवळपास १०० तक्रारी प्राप्त हाेतात. यामध्ये समाजमाध्यमांच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करणे, फसवणूक करणे, पैशाची मागणी करणे, बनावट अकाउंट तयार करून पैसे मागणे, पिन क्रमांक मागून पैसे गहाळ करणे आदी तक्रारींचा समावेश आहे.

बाॅक्स

...अशी काळजी घ्या

१) एखाद्या मजकुराचा चिकित्सक अभ्यास केल्याशिवाय ताे लाइक, शेअर किंवा फाॅरवर्ड करू नका.

२) आक्षेपार्ह मजकुरावर प्रतिक्रिया देऊ नका.

३) काही व्हॉटस्ॲप ग्रुपमध्ये दुसऱ्या समाजाविषयी तेढ निर्माण हाेईल, असा आक्षेपार्ह मजकूर सातत्याने टाकला जातो. अशा ग्रुपमधून लेफ्ट हाेणे चांगले.

४) फेसबुकवरील आपले फाेटाे, प्राेफाइल मित्रांव्यतिरिक्त इतरांनी बघू नये यासाठी प्राेफाइल लाॅक करून ठेवा. तेवढीच सुरक्षितता वाढेल.

बाॅक्स

मुलींच्या फाेटाेंचा दुरुपयाेग

हाेण्याची शक्यता

व्हाॅटस्ॲप, फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर मुली फाेटाे टाकत असतात. या फाेटाेंचा दुरुपयाेग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेट

एटीएम ब्लाॅक झाला, लाॅटरी लागली, एखादे बक्षीस मिळणार, बँकेमधून बाेलताे, असे सांगून बँक खात्याची माहिती मागितली जाते. अशावेळी खात्याची माहिती, तसेच एटीएम पिन कधीच देऊ नये. फेसबुकवरील स्वत:ची प्राेफाइल लाॅक करून ठेवावी. जेणेकरून आपली माहिती, फाेटाे इतरांना बघता येणार नाही. एखाद्याचे बनावट अकाउंट तयार करून मित्र असल्याचे भासवून पैशाची मागणी करीत असेल, तर सावध राहावे. आपला मित्र पैशासाठी फाेन करेल, फेसबुकवर कशाला पैशाची मागणी करेल, हा साधा विचार करावा. साध्या- साध्या गाेष्टींकडे लक्ष दिल्यास आपली फसवणूक हाेणार नाही. आक्षेपार्ह मजकूर फाॅरवर्ड करू नये.

-कुंदन गावडे, पाेलीस निरीक्षक सायबर शाखा, गडचिराेली