शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा परिवर्तनास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:56 IST

वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.

ठळक मुद्देप्रशासन पोहोचले नागरिकांच्या दारी : मुलचेरा तालुका प्रशासनाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.तालुक्यातील सर्व सातबारांचे संगणकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संजय गांधी शाखेअंतर्गत निराधार योजना, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ४ हजार १०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत २६ लाभार्थी व आम आदमी विमा योजनेअंतर्गत ३६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. ४ हजार ५१३ नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्र वितरित केले आहे. वनहक्क वाटप उपक्रमाअंतर्गत देवदा येथील ५९ लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १ हजार ८०९ नागरिकांना वैयक्तिक पट्टे व ८६ लाभार्थ्यांना सामूदायिक पट्टे वितरित केले आहेत. ४०.७९ हेक्टर आर झुडूपी जंगल निर्वानीचे प्रस्ताव सादर केले आहेत. १२ गावांना पेसा गावांचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर झाले आहेत. गारपीठग्रस्त ७० मका शेतकºयांना १ लाख ९१ हजार रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. ३८३ धान उत्पादक शेतकºयांना २२ लाख ८४ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी १६ लाख रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे.निवडणूक शाखेच्या वतीने यावर्षी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली. ५१५ नवीन मतदार झाले आहेत. ३१७ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे कमी केली आहेत. तर २७० मतदार स्थलांतरित झाले आहेत. तर १२४ मतदारांची नावे दोनदा झाली असल्याचे आढळून आले. सदर बदलही करण्यात आला. धन्नूर गावातील आपातग्रस्तांना १६ लाख रूपयांची मदत दिली आहे. जखमी व्यक्तींना ३८ हजार ५०० मृत जनावरांच्या मालकांना ५४ हजार रूपयांची मदत वितरित केली आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार ५१५ कुटुंब, अन्न सुरक्षा अंतर्गत १७ हजार ७९ लाभार्थ्यांना राशनचा लाभ दिला जात आहे. हे सर्व उपक्रम मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात केले जातात.चार हजार कुटुंबांना रोहयोची कामेचालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ हजार ३७ कुटुंबातील ८ हजार ८१६ नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूण २ लाख ६७ हजार २७० मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. ५ कोटी ८५ लाख रूपयांची मजुरी अदा केली आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना त्याच हप्त्यात मजुरी उपलब्ध होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे मजुरी थकीत राहण्याचे प्रमाण मुलचेरा तालुक्यात अतिशय कमी आहे. रोजगाराची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती