आतापर्यंत एकूण काेराेनाबाधितांची संख्या २८ हजार ७६३ एवढी झाली आहे. त्यापैकी २६ हजार ४५२ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या १ हजार ६१४ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण ६९७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन सात मृत्यूमध्ये ४८ वर्षीय पुरुष महागाव ता.अहेरी,४४ वर्षीय पुरुष ता. देसाईगंज, ४५ वर्षीय पुरुष टेकडा ता. सिरोंचा, २१ वर्षीय पुरुष ता.सिरोंचा, ६० वर्षीय पुरुष ता.अहेरी, ५० वर्षीय पुरुष ता.अहेरी, ७५ वर्षीय पुरुष गणेश काॅलनी गडचिरोली यांचा समावेश आहे.
नवीन ५३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २७, अहेरी तालुक्यातील ५, आरमोरी ४, चामोर्शी तालुक्यातील ८, धानोरा तालुक्यातील २, कोरची तालुक्यातील ४, कुरखेडा तालुक्यातील १, सिरोंचा तालुक्यातील १ तर देसाईगंज तालुक्यातील १ जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २६५ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील ७३, अहेरी २९, आरमोरी २, भामरागड ४, चामोर्शी ६३, धानोरा ६, एटापल्ली १४, मुलचेरा १३, सिरोंचा १४, कोरची ११, कुरखेडा ६ तसेच देसाईगंज येथील ३० जणांचा समावेश आहे.