शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४०० संयुक्त देयता गट स्थापन करणार

By admin | Updated: August 29, 2015 00:14 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५४ शाखांमधून ३ लाख ९० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा पुरविली जात आहे.

जिल्हा बँकेचा संकल्प : शेतकऱ्यांना मिळणार सुलभ कर्जगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५४ शाखांमधून ३ लाख ९० हजार ग्राहकांना बँकिंग सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील लघु व्यावसायिक व सर्वसामान्यांच्या मागणीनुसार नाबार्डच्या साहाय्याने जिल्ह्यात संयुक्त देयता गट स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असून बँकेंमार्फत जिल्ह्यात ४०० संयुक्त देयता गट स्थापन करण्याचा संकल्प बँक प्रशासनाने केला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हावासीयांकरिता नवीन दोन योजनांचा शुभारंभ केला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते दैनिक बचत ठेव संकलन व कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक क्रिष्णा कोल्हे, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा अग्रणी प्रबंधक एस. एम. पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आईलवार आदी उपस्थित होते. यावेळी उद्घाटनीय भाषणात मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या फार वेगळा असून उद्योगधंदेविरहीत जिल्हा आहे. येथील शेती व्यवसाय पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील लघु व्यावसायिक, बेरोजगार व युवकांनी जिल्हा बँकेच्या संयुक्त देयता गटाच्या माध्यमातून स्वत:चा व जिल्ह्याचा विकास साधावा, असे सांगितले. जिल्हा बँकेमार्फत संयुक्त देयता गटाचे नेटवर्क तयार करावयाचे असून किमान कौशल्यावर आधारित लघु व्यावसायिकांनी जिल्ह्यातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना सूक्ष्म पथपुरवठा होण्याकरिता ५ ते १० व्यक्तीचा समुह तयार करून संयुक्त देयता गट योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक क्रिष्णा कोल्हे यांनी जिल्हा बँकेचे कार्य उत्तमरित्या सुरू असून यात बँकेने संयुक्त देयता गटाची योजना सुरू करून जिल्हावासीयांना स्वयंपूर्ण होण्याची दालने खुली केली आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा अग्रणी प्रबंधक एस. एम. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला बँकेचे उपव्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे, डी. जे. वालदे, एम. बी. निखाडे, सहाय्यक व्यवस्थापक जी. के. नरड, आर. वाय. सोरते, ए. के. पत्रे आदींसह महिला व व्यावसायिक उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार, संचालन किरण साबरे यांनी केले तर आभार सहाय्यक व्यवस्थापक आर. वाय. सोरते यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)