शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा प्रकार पाहून पिकांची निवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

धान पिकाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यात करडई, हरभरा तसेच वटाणा अशा पिकांची निवडही करता येईल, असे सिंग म्हणाले. जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन पथकांनी कनेरी, पारडी, वसा, पोर्ला, लाडज या पूरबाधित क्षेत्रांची पाहणी केली. कनेरी, पारडी व वसा या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून, झालेल्या नुकसानाबाबत चर्चा केली. शुक्रवारी भेटी दिलेल्या पथकात सिंग यांच्यासह केंद्रीय कार्यालय नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंन्द्र सहारे, तसेच इतर पथकात रमेशकुमार गंटा, आर.बी.कौल यांचा समावेश होता.

ठळक मुद्देकृषी मंत्रालयाच्या संचालकांचा शेतकऱ्यांना सल्ला, दोन दिवसांचा दौरा आटोपून केंद्रीय समिती रवाना

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील पूरस्थितीनंतरची पाहणी करताना केंद्रीय पथकाने दुसऱ्याही दिवशी काही गावांना भेटी दिल्या. यावेळी पथकातील सदस्य आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी.सिंग यांनी पीक निवडीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. केवळ धानपीक न घेता जमिनीचा प्रकार, वातावरण पाहून पीकांची निवड करा, असा सल्ला त्यांनी दिला.धान पिकाबरोबरच गडचिरोली जिल्ह्यात करडई, हरभरा तसेच वटाणा अशा पिकांची निवडही करता येईल, असे सिंग म्हणाले. जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन पथकांनी कनेरी, पारडी, वसा, पोर्ला, लाडज या पूरबाधित क्षेत्रांची पाहणी केली. कनेरी, पारडी व वसा या भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून, झालेल्या नुकसानाबाबत चर्चा केली. शुक्रवारी भेटी दिलेल्या पथकात सिंग यांच्यासह केंद्रीय कार्यालय नागपूरचे अधीक्षक अभियंता महेंन्द्र सहारे, तसेच इतर पथकात रमेशकुमार गंटा, आर.बी.कौल यांचा समावेश होता.कनेरी या गावात गजानन पाणनकर या शेतकऱ्याशी पथकाने संवाद साधला. त्यांच्या शेतात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याबाबत सविस्तर माहिती घेवून त्या शेताची पाहणीही पथकाने केली. पारडी या गावातील शोभा बोकडे या शेतकऱ्याच्या पूरबाधित क्षेत्राचीही पाहणी पथकाने केली. गोगाव येथील रस्त्यालगत असलेल्या शेतामधील पूरपरिस्थितीनंतर नव्याने लागण केलेल्या करडई या पिकाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेवटी वसा येथील कुमरे यांच्या शेतीमधील धान कापणीनंतरची परिस्थिती प्रत्यक्ष शेतात जावून पाहिली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानाची माहिती सदस्यांना सांगितली.गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट केंद्रीय पथकातील सदस्य आर.पी.सिंग यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरेाली येथे भेट देवून धान खरेदी प्रक्रिया पाहिली. यावेळी पूरबाधित क्षेत्रातून आलेल्या धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. धान खरेदी केंद्रावरील प्रक्रिया जाणून घेत असताना धानाची गुणवत्ता व शेतकऱ्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत पथकातील सदस्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी बाजार समितीचे प्रशासक चंद्रशेखर भडांगे व नंदू कुमरे यांनी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. पथकाबरोबर तहसीलदार महेंद्र गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ.संदीप कऱ्हाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, सहकार अधिकारी रंधये उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती