महसूल विभागाची कावाई : ९१ हजारांचा दंड वसूलसिरोंचा : स्थानिक महसूल विभागाने धाड टाकून अवैधरीत्या गौण खनिज (मुरूम) वाहतूक करणाऱ्या १० ट्रॅक्टर ट्रालीसह जप्त केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यात सदर वाहनातून १७ ब्रास मुरूमापोटी ९१ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.गौण खनिज सर्वे नंबर ७१ मध्ये मुरूमाचे उत्खनन सुरू होते. महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी धाड टाकून ट्रॅक्टर जप्तीची कारवाई केली. यातील दोन ट्रॅक्टर व ट्राली विनाक्रमांकाच्या आहेत. सध्या राष्ट्रीय महामार्गाला छेदणाऱ्या गोदावरी पुलाच्या जोड रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शेकडो ब्रास मुरूमाची आवश्यक असून शासनमान्य खदानितून गौण खनिजाची उचल होत आहे. मात्र त्यात अनियमितता आढळून आल्याने सदर कारवाई सिरोंचाचे तहसीलदार अशोक कुमरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार कडार्लावार, मंडळ निरीक्षक मंडावार व तलाठी गजभिये यांनी केली. या प्रकरणातील मुरूम राष्ट्रीय महामार्गाच्या जोड रस्त्यावर टाकण्यासाठी नेण्यात येत होता. (तालुका प्रतिनिधी)
सिरोंचात १० ट्रॅक्टर जप्त
By admin | Updated: December 20, 2015 01:19 IST