शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विटाभट्टीवरील १० ट्रॅक्टर लाकूड जप्त

By admin | Updated: February 12, 2016 01:50 IST

तालुक्यातील मुरूमगापासून आठ किमी अंतरावर असलेल्या कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १० ट्रॅक्टर लाकूड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून गुरूवारी जप्त केले आहेत.

वन विभागाची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल; कुलभट्टी येथील घटनाधानोरा : तालुक्यातील मुरूमगापासून आठ किमी अंतरावर असलेल्या कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १० ट्रॅक्टर लाकूड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून गुरूवारी जप्त केले आहेत. त्याचबरोबर ६० हजार रूपयांच्या विटाही जप्त केल्या आहेत. याप्रकरणी दिनकर भानारकर रा. कुलभट्टी व राजीक रहेमान खान रा. मुरूमगाव या दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी जंगलातील लाकडाचा वापर केला जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात असल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले असता, घटनास्थळावर लाकडांचा ढिग पडला असल्याचे दिसून आले. सदर कारवाई मुरूमगाव (पूर्व) वन परिक्षेत्राधिकारी वाय. एस. उईके यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक एच. डी. मुंजुमकर, वनरक्षक जे. जी. आत्राम, वनरक्षक आर. बी. मडावी, लाकडे, दुधबळे, दिलीप आत्राम, गेडाम यांनी केली. वन विभागांच्या अधिकाऱ्यांनी विटाभट्टीबाबत महसूल विभागाच्या परवान्याबाबत विचारले असता, महसूल विभागाकडूनही परवाना काढला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे विटाभट्टीचा संपूर्ण व्यवसायच अवैधरितीने केला जात असल्याची लक्षात आले. त्यामुळे पंचनाम्यानंतर विटांबाबतही महसूल विभागाकडून दंड ठोठावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारवाईनंतर वन परिक्षेत्राधिकारी वाय. एस. उईके व भगवान आत्राम यांच्या मार्गदर्शनात जंगल भागात चौकशीसाठी पथके तैनात केली आहेत. (तालुका प्रतिनिधी)