शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने घेतला दुसरा बळी

By admin | Updated: October 23, 2016 01:30 IST

वाहन खड्ड्यात गेल्यामुळे अपघात होऊन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज-लाखांदूर मार्गावर घडली.

प्रशासनाचे दुर्लक्ष : देसाईगंज-लाखांदूर मार्गाची दुरवस्थादेसाईगंज : वाहन खड्ड्यात गेल्यामुळे अपघात होऊन एक इसम जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज-लाखांदूर मार्गावर घडली. मनिराम सोनकुसरे रा. चिचोली (भागडी) ता. लाखांदूर जि. भंडारा असे मृतक इसमाचे नाव आहे. आत्माराम सोनकुसरे हे लाखांदूर येथील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक म्हणून कार्यरत होते. २००८ मध्ये ते या पदावरून सेवानिवृत्त झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित झालेल्या रस्त्यावरील खड्ड्याने घेतलेला हा दुसरा बळी आहे. विशेष म्हणजे सदर दोन्ही घटना आॅक्टोबर महिन्यात घडल्या. देसाईगंज-ब्रह्मपुरी, देसाईगंज-लाखांदूर, देसाईगंज-कुरखेडा या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून आजवर या तिन्ही मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. १६ फेब्रुवारी २०१६ ला देसाईगंजच्या विश्रामगृहाजवळ दोन इसमांचा खड्ड्यांमुळे जीव गेला. चार दिवसानंतर वन विभागातील अकबर पठाण नामक व्यक्तीला वाहनाने धडक दिल्याने तेही ठार झाले. ६ आॅक्टोबर २०१६ रोजी बैद्यनाथ कारखान्याजवळ मंगला देविदास शेंडे नामक युवतीचा अपघाताने मृत्यू झाला. तर पुन्हा याच मार्गावर खड्ड्यात वाहन गेल्याने आत्माराम मनिराम सोनकुसरे यांचा मृत्यू झाला. सदर अपघातातील दुचाकीचा क्रमांक एमएच-३६-क्यू-७३७५ असा आहे. सोनकुसरे हे सदर क्रमांकाच्या दुचाकीने देसाईगंजकडे येत असताना खड्ड्यात वाहन गेल्याने मेंदुला जबर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. देसाईगंज शहरातील मुख्य मार्गावर अपघाताची मालिका कायम आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. दुरवस्था झालेल्या प्रमुख मार्गाची तत्काळ दुस्ती करावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमगाववासीयांनी दिला आहे. हा मार्ग गडचिरोली आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. या महामार्गावर आंतरराज्यीय वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर राहते. (प्रतिनिधी)