शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याही दिवशी अतिक्रमण हटाव

By admin | Updated: July 6, 2017 01:47 IST

शहरात रस्त्याच्या दुतर्फा अवैध अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले होते. या अतिक्रमणधारकांविरोधात ४ जुलैपासून मोहीम राबविण्यात आली.

व्यावसायिक प्रतिष्ठाने पाडली : चामोर्शीत नगर पंचायतची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अवैध अतिक्रमणधारकांनी बस्तान मांडले होते. या अतिक्रमणधारकांविरोधात ४ जुलैपासून मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीम दुसऱ्याही दिवशी सुरूच होती. येथील अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली. बुधवारी लक्ष्मीगेटपासून मुख्य बाजारपेठ असलेल्या दुकान व्यावसायिकांनी लावलेल्या लोखंडी टिनाचे शेड काढण्यात आले. अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील टिनाचे शेड स्वत: काढले तर बांधकाम करण्यासाठी रस्त्यावर ठेवलेले बांधकाम साहित्य उचलण्यात न आल्याने प्रशासनाकडून जेसीबी मशीनद्वारे सदर साहित्य जमा करून ट्रॅक्टरद्वारे ताब्यात घेण्यात आले. चामोर्शी शहरातील संपूर्ण पानटपऱ्या, चहाटपरी, चायनीज, हॉटेल, फळांचे दुकान तसेच मुख्य रस्त्यावर असलेले सिमेंट काँक्रिटचे उंचवटे काढण्यात आले. सदर उंचवटे जेसीबी मशीनच्या सहाय्याने काढण्यात आले. बसस्थानक परिसरात असलेल्या किरकोळ व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील अतिक्रमण स्वत:च काढले. बुधवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण सायंकाळपर्यंत काढण्यात आले. याकरिता नगर पंचायत प्रशासनाकडून जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात उपस्थित होते. शहरातील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नालीतील गाळ उपसा करण्यास व आठवडी बाजाराच्या दिवशी रहदारीसाठी अडचण निर्माण व्हायची. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी दुकानदारांना सूचना केल्या होत्या. सदर दुकानदारांनी स्वत: अतिक्रमण काढून न. पं. ला सहकार्य केले आहे, असे मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी सांगितले.