शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पाठ्यपुस्तके तालुकास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:29 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.

ठळक मुद्दे१.१७ लाख लाभार्थी : शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळत असल्याने पालकवर्ग पाठ्यपुस्तके खरेदी करीत नाही. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी शाळेमध्ये यावा, यासाठी शाळेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचतो. मात्र त्याला पाठ्यपुस्तके मिळाली नाही तर त्याचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत.जिल्हाभरात एकूण १ लाख १६ हजार ९१० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना ६ लाख ३४ हजार ४८६ पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात पहिल्या वर्गाचे एकूण १४ हजार ३१३, दुसऱ्या वर्गाचे १४ हजार ३७३, तिसºया वर्गाचे १४ हजार ७०३, चौथ्या वर्गाचे १४ हजार ८८९, पाचव्या वर्गाचे १४ हजार ३६६, सहाव्या वर्गाचे १४ हजार ५०८, सातव्या वर्गाचे १५ हजार २०८, आठव्या वर्गाचे १५ हजार २०८ लाभार्थी विद्यार्थी आहेत.विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर अन्यायसर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर असा भेदभाव केला जातो. पाठ्यपुस्तके केवळ अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण होते. शासन विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेशापासून वंचित ठेवून त्यांची कुचंबना करते.गणवेशाचा निधी आलाच नाहीगट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली असली तरी गणवेशाचा निधी मात्र उपलब्ध झाला नाही. गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हे सुध्दा अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे किंवा गणवेश उपलब्ध होण्यासाठी अर्धे सत्र संपत असल्याचा अनुभव येत आहे. अजुनपर्यंत निधी न आल्याने याही वर्षी गणवेश मिळण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.