शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या अनुदानात शाळा खर्चाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:45 IST

शाळेचा किरकोळ खर्च भागविण्यासाठी जिल्हाभरातील शाळांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुमारे १ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पटसंख्येच्या आधारावर १० हजार ते २० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण होणार आहे. हे तुटपुंजे अनुदान वर्षभर कसे पुरवायचे याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसर्व शिक्षा अभियान : १ कोटी ६३ लाखांचे अनुदान मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेचा किरकोळ खर्च भागविण्यासाठी जिल्हाभरातील शाळांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुमारे १ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पटसंख्येच्या आधारावर १० हजार ते २० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण होणार आहे. हे तुटपुंजे अनुदान वर्षभर कसे पुरवायचे याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागणार आहे.शाळेला इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने शाळेचा किरकोळ खर्च भागविता यावा, यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थी संख्येनुसार शाळा अनुदानाचे वितरण केले जाते. १ ते १०० पर्यंत पटसंख्या शाळेस १० हजार रूपये, १०१ ते २५० पर्यंतच्या पटसंख्या असलेल्या शाळेस १५ हजार रूपये व २५१ ते १ हजार रूपये विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेस २० हजार रूपये अनुदान दिले जाते. या अनुदानातून मुख्याध्यापक शाळेतील नादुरूस्त असलेल्या भौतिक वस्तूंची दुरूस्ती करणे, खेळाचे साहित्य, विज्ञान प्रयोगशाळेत साहित्य खरेदी केले जातात. तसेच वीज बिल, पाण्याची सुविधा, अध्यापनाकरिता आवश्यक शैक्षणिक साहित्य निर्मिती यावर सुध्दा सदर अनुदान खर्च करता येते.शाळा इमारतीची देखभाल, शौचालयाची स्वच्छता, दुरूस्ती, शाळेच्या आवारात भौतिक सुविधा निर्माण करणे आदींवरही खर्च केला जातो. भारत सरकारच्या स्वच्छता विषयक मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ भारत विद्यालय या संकल्पनेचा उद्देश अधिक दृढ होईल. यासाठी सुध्दा आवश्यकतेनुसार ब्लिचिंग पावडर वापर करणे, डांबर गोळ्या, हात धुण्याचे साबून, झाडू, कचरा पेटी तसेच बालस्नेही वातावरण निर्मितीवर आवश्यक तो खर्च करण्याची मुबा आहे. गडचिरोली जिल्ह्यात १ ते १०० पर्यंत पटसंख्या असलेल्या १ हजार ३५८, १०१ ते २५० पटसंख्या असलेल्या १७२ व २५१ ते १ हजार विद्यार्थी संख्या असलेल्या १० अशा एकूण १ हजार ५४० शाळा आहेत. या सर्व शाळांना सर्व शिक्षा अभियानच्या नियमाप्रमाणे १ कोटी ६३ लाख ६० हजार रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.अनुदानात वाढ करणे आवश्यकमागील कित्येक वर्षांपासून शाळांना तेवढेच अनुदान दिले जाते. वाढत्या महागाईनुसार सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे वर्षभराचा शाळेचा खर्चही वाढला आहे. मात्र अनुदानात वाढ झाली नाही. परिणामी प्राप्त झालेल्या अनुदानातच वर्षभराचा खर्च करताना मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोकवर्गणीच्या माध्यमातून कधीकधी शाळा खर्च भागवावा लागत आहे. शाळेकडे पैसा नसल्याने अनेक कार्यक्रम घेतानाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे अनुदानात वाढ करण्याची मागणी आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा