शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालय बंदच

By admin | Updated: August 12, 2014 23:45 IST

पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्यात यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे,

पेसा कायद्याला विरोध : दुसऱ्याही दिवशी अहेरी, आलापल्लीत अहेरी : पेसा कायदा रद्द करण्यात यावा, जिल्ह्यातील वर्ग ३ व ४ च्या पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, जिल्हा निवड मंडळ स्थापन करण्यात यावे, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी सुशिक्षित बेरोजगार संघटना व विविध बिगर आदिवासी संघटनांच्यावतीने अहेरी व आलापल्ली येथे शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. तसेच अहेरी, आलापल्लीतील बाजारपेठही पूर्णत: बंद होती. सोमवारी एटापल्ली व आलापल्ली येथे शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. पेसा कायद्याच्या विरोधात बिगर आदिवासी संघटनांनी गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभर आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी सकाळपासूनच बिगर आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळा, महाविद्यालया परिसरात जाऊन बंदचे आवाहन केले. व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. बंददरम्यान सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते व शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून ‘पेसा कायदा रद्द झाला पाहिजे, बिगर आदिवासीवरील अन्याय सहन करणार नाही’ अशी नारेबाजीही केली. या आंदोलनात अहेरी जिल्हा संघर्ष समिती तसेच विविध विद्यार्थ्यांच्या संघटनांनीही पुढाकार घेतला. अहेरी येथील आंदोलनात अहेरीचे ग्रा. पं. सदस्य रिजवान शेख, रविनेल चुधरी, दिग्विजय खतवार, संजय पोहणेकर, बबलू शेख, सतीश देरकर, पप्पू मद्दीवार, श्रीनिवास वीरगुनवार, पृथ्वीराज कोल्हावार, पवन दोंतुलवार तसेच आलापल्ली येथे रवी मुप्पीडवार, रोमीत तोमर्लावार आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)