शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक शाळा, एक बंधारा उपक्रम जोमात

By admin | Updated: November 27, 2014 23:35 IST

‘एक शाळा, एक बंधारा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळांमार्फत वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. सदर उपक्रमाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

गडचिरोली : ‘एक शाळा, एक बंधारा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी शाळांमार्फत वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. सदर उपक्रमाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.भगवंतराव हिंदी हायस्कूल, गडचिरोली : बोदली येथील कठाणी नदी घाटावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, मुख्याध्यापिका लिना हकीम, समशेर खॉ पठाण, नगरसेवक विजय गोरडवार, चिमुरकर, उईके, नईम शेख, पंकज खांडरे, चौधरी, रॉय, बाला, खुणे, शेख, ठाकरे, मुंगनेलवार, कट्टी, समिर पठाण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ५०० सिमेंटच्या रिकाम्या बॅगचा वापर करून बंधारा बांधला. यावेळी हायस्कूलमधील इयत्ता ८ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.लोकसेवा माध्यमिक विद्यालय, आमगाव : देसाईगंज तालुक्यातील आमगाव (बुट्टी) येथील विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधला. यावेळी सरपंच अरूणा दोनाडकर, मुख्याध्यापक एन. एल. तितीरमारे, ग्रामविकास अधिकारी पी. एल. पेशने, आर. बी. कुथे, जी. के. साखरे, दीपक ठाकरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.स्व. रामचंद्र दखणे विद्यालय, मुरूमगाव : विद्यार्थ्यांच्यावतीने टिपागडी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सिमेंटच्या रिकाम्या बॅगचा वापर करून वनराई बंधारा बांधला. बंधारा बांधण्यासाठी मुख्याध्यापक सतिश सुरनकर, ग्रामसेवक पी. एस. बुराडे, हरित सेनेचे प्रमुख बाळकृष्ण बोरकर, सरपंच अजमन रावटे, उपसरपंच लता पुंघाटे, प्रा. ओम देशमुख, महेंद्र जांभुळकर, भाष्कर मेश्राम, संतोष देशमुख, विलास चौधरी, ग्रा. पं. सदस्य धर्मराज गडपायले, रोशन पुंघाटे, रोहिदास मार्गीया, शामराव कन्नाके, रेखा पदा, मडावी उपस्थित होते. भूजल पातळीवर वाढ व्हावी, तसेच वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, याउद्देशाने बंधारा बांधण्यात आला.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरडा, जि. प. शाळा राजन्नापल्ली : ‘एक शाळा, एक बंधारा’ उपक्रमांतर्गत आरडा व राजन्नापल्ली शाळेच्यावतीने नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आर. ए. आलम, मुख्याध्यापक डी. एम. दुर्गे, यू. बी. चौधरी, एम. एस. उईके, एन. एल. वेलादी, एम. जी. आत्राम उपस्थित होत्या. इंदिरा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सुभाषग्राम : विद्यार्थ्यांच्यावतीने तुमडी येथील नाल्यावर सिमेंटच्या बॅगमध्ये रेती भरून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सुभाषग्रामच्या सरपंच बेबीराणी किंतुनिया, प्राचार्य बेपारी, पर्यवेक्षक मेश्राम व शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नाल्यालगत असलेल्या नर नारायण सेवा आश्रममध्ये सहभोजन कार्यक्रमातही सहभाग दर्शविला. भूजल पातळीत वाढ व्हावी, याउद्देशाने वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (लोकमत वृत्तसेवा)