शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अगरबत्ती प्रकल्पातून शेकडाेंना राेजगार दिल्याचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST

गडचिराेली : मेक इन गडचिराेलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडाे बेराेजगार ...

गडचिराेली : मेक इन गडचिराेलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अगरबत्ती प्रकल्प निर्माण करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून शेकडाे बेराेजगार महिलांना राेजगार दिल्याचे समाधान मिळत आहे, असे प्रतिपादन आ.डाॅ.देवराव हाेळी यांनी केले.

मेक इन गडचिराेलीच्या माध्यमातून १२ फेब्रुवारी राेजी शुक्रवारला चामाेर्शी येथे अगरबत्ती प्रकल्पाचा शुभारंभ आ.डाॅ.देवराव हाेळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते.

जिल्ह्यातील शेकडो परिवारांना रोजगार उपलब्ध करून दिलेले वचन पूर्णत्वास येत असून शुक्रवारी येथील एकत्रित ७० अगरबत्ती मशीनयुक्त अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून येथेच अगरबत्तीचा सुगंधित मसाला तयार करण्यात येणार आहे व एकाच जागी काम करून शेकडो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे, असे आ.डाॅ.हाेळी यांनी सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी चंद्रशेखर कोहळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, एसीबीचे उपअधीक्षक सुरेंद्र गरड, आत्माचे प्रकल्प संचालक संदीप कऱ्हाळे, अग्रणी बँकेचे एलडीएम टेंभुर्णे, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक अभयसिंग चौधरी, पाेलीस निरीक्षक नागनाथ पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे अतुल पवार, आरटीसीचे संचालक चेतन वैद्य, हेमंत मेश्राम, जयराम चलाख, आशिष पिपरे, साेनाली पिपरे, चंद्रशेखर मस्के, ओमदास झरकर आदी उपस्थित हाेते.