शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

खोदतळे व पाणवठ्यांमुळे संजीवनी

By admin | Updated: June 4, 2017 00:43 IST

उन्हाळ्यात जंगलांना लागणारे वनवे आणि वनक्षेत्रातील पाण्याचे स्रोत आटले म्हणजे वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात.

सिर्सी उपक्षेत्र : वनपरिक्षेत्रातील ११ खोदतळे व १३ पाणवठ्यात उन्हाळ्यातही पाणीलोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : उन्हाळ्यात जंगलांना लागणारे वनवे आणि वनक्षेत्रातील पाण्याचे स्रोत आटले म्हणजे वन्यजीव लोकवस्तीकडे धाव घेतात. प्रसंगी पाळीव प्राण्यासह मानवाचाही बळी घेतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सिर्सी उपक्षेत्रात वन विभागाने ११ खोदतळे व १३ पाणवठ्यांची निर्मिती केली. परिणामी भर उन्हाळ्यातही याठिकाणी पाणी आहे. त्यामुळे या भागातील वन्यजीवांना नवसंजीवनी मिळाली आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात मोहफूल संकलनासाठी काही व्यक्ती झाडाखालील पालापाचोळा जमा करून त्याच ठिकाणी जाळतात व घरी निघून येतात. ही आग जंगलात पसरते. पुढे वनवे रौद्ररूप धारण करून संपूर्ण जंगलात विस्तारतो. या आगीत वन्यजीव तडफडून मरतात किंवा मोकळ्या जागेचा आश्रय घेतात. या ठिकाणीही मानवाकडून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. हे कृत्य टाळण्यासाठी सिर्सी वन विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहफूल वेचणाऱ्या लोकांना मोहफुलाच्या झाडाखालील पालापाचोळा जाळू दिला नाही. झाडाखालील पालापाचोळा झाडून तो बाजुला करण्यास सांगितले व दाट जंगलात ठिकठिकाणी १३ पाणवठे तयार करून त्यामध्ये मजुरांकरवी नियमित पाणी टाकण्यात आले. पोर्ला वनपरिक्षेत्रात ११ खोदतळ्यात उन्हाळभर जलसाठा असल्याने या भागातील वन्यजीवांना पाणी उपलब्ध होण्यास मदत झाली व उपक्षेत्रातील वन्यप्राण्यांना कुठल्याही प्रकारचा धोका झाला नाही. वन विभागाच्या वतीने सिर्सी उपक्षेत्रात पूर्वीच उपाययोजना करण्यात आल्या. याचा लाभ वन्यप्राण्यांना झाला. शिवाय मानवासाठीही लाभदायक ठरला. भर उन्हाळ्यातही येथील जलसाठ्यांमध्ये पाणी असल्याने वन्यप्राण्यांना संजीवनी मिळाली आहे. वन विभागाच्या उपक्रमाबद्दल सिर्सी उपक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. अनेक प्रजातींच्या प्राण्यांचा वावरपोर्ला वनपरिक्षेत्रातील सिर्सी उपवन क्षेत्रात दाट व झुडूपी जंगल आहे. या जंगलात लहान टेकड्या व नाल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे या भागात बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, हरीण, ससे, लांडगे, कोल्हे यासह विविध प्राण्यांचा वावर आहे. या वन्य प्राण्यांसाठी जंगलात पाणवठे व खोदतळे असल्याने प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत नाही. पोर्ला, वसा, चुरमुरा, किटाळी, देऊळगाव, इंजेवारी, देलोडा, बोरी, आदी गावातील परिसरात जंगल व्यापले आहे. त्यामुळे हा परिसर विस्ताराने मोठा आहे. विशेषत: झुडूपी जंगल असल्याने वन्यप्राण्यांसाठी सोयीचा आहे. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे.