शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

५ कोटींची संजीवनी

By admin | Updated: August 6, 2014 23:50 IST

वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे.

कृषी संजीवनी योजना : ८ कोटी ६५ लाख थकीतगडचिरोली : वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे. यातून जवळपास ५ कोटी रूपयाची रक्कम माफ केली जाणार आहे. दरवर्षी पडणार ओला किंवा कोरडा दुष्काळ, खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत येतात. उत्पन्नच न झाल्याने मागील अनेक वर्षापासून कृषीपंपाचे वीजबिल राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडे थकीत आहे. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने सदर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या मुद्दलापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरल्यास उर्वरित ५० टक्के मुद्दल राज्यसरकार भरणार आहे. दंड व व्याजाची रक्कमसुध्दा माफ केली जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्याकडे थकीत असलेल्या रकमेपैकी २० टक्के रक्कम ३१ आॅगस्टपूर्वी, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपूर्वी व उर्वरित १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोंबरपूर्वी भरायची आहे. थकबाकी भरल्यानंतर तसेच १ एप्रिल २०१४ नंतरचे बिल नियमितपणे भरले असेल तर थकबाकीची ५० टक्के रक्कम शासन भरणार आहे. व्याज व दंडसुध्दा माफ करणार आहे. नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पुढील ६ महिन्याचे बिल शासन भरणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकुण १८ हजार १०७ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. यापैकी १३ हजार २६८ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना ४ कोटी ३२ लाख ५० हजाराची सवलत मिळणार आहे. ४ हजार ८३९ शेतकरी वीजबिलांचा भरणा नियमितपणे करीत आहे. त्यांचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. असे एकुण जवळपास ५ कोटींचे वीजबिल माफ होणार आहे. (नगर प्रतिनिधी)