शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संजय गंडाटे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: January 7, 2017 01:25 IST

गडचिरोली प्रेसक्लबतर्फे शुक्रवारी पत्रकार दिनी गडचिरोली जिल्ह्यातील मोती उत्पादक शेतकरी संजय गंडाटे यांना

गडचिरोली : गडचिरोली प्रेसक्लबतर्फे शुक्रवारी पत्रकार दिनी गडचिरोली जिल्ह्यातील मोती उत्पादक शेतकरी संजय गंडाटे यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, भाजप नेते प्रमोद पिपरे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेसक्लबचे अध्यक्ष सुरेश नगराळे होते. या कार्यक्रमात मोती उत्पादक शेतकरी संजय गंडाटे यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रेसक्लबच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले की, पत्रकारिता हे लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार सातत्याने करीत असतात. दबलेली एखादी महत्त्वपूर्ण गोष्ट लोकांपुढे आणून संबंधित अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी तत्परतेने बजाविलेली आहे. खासदार, आमदार म्हणून आम्ही जिल्हा विकासासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्हा विकासाच्या प्रक्रियेत पत्रकारांनीही योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला तळागाळातील घटनांची माहिती मिळते. पत्रकार हे सर्व क्षेत्राशी संबंधित असल्याने समस्यांची जाण त्यांना चांगल्या प्रकारे असते, असे ते म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर म्हणाले, गडचिरोलीतील पत्रकारांनी शासनाच्या पुरस्कार योजनेत अधिकाधिक संख्येने सहभाग घ्यावा. शासनदरबारी त्यांना ओळख देण्यासाठी माझे सहकार्य नेहमीच राहिल. गडचिरोलीतच खरा भारत आहे. या जिल्ह्यातील लोक चांगल्या स्वभावाचे आहेत. असे दैठणकर म्हणाले. सत्काराला उत्तर देताना संजय गंडाटे म्हणाले, लहानपणापासूनच काही तरी वेगळे करण्याची माझी इच्छा होती. गडचिरोलीतील पत्रकारांनी मला प्रसिध्दी दिल्यामुळे माझ्याकडे आता दूरवरून अनेक शेतकरी येत आहे. माझ्या यशाचे श्रेय पत्रकारांना देतो, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन जयंत निमगडे व प्रास्ताविक नंदकिशोर काथवटे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)