शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाक्याअभावी सागवानाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती.

ठळक मुद्देकापसातून लाकडांची वाहतूक : वैनगंगेवरील मुधोली गावाजवळील पूल

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील मुधोलीजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासनाने पूल बांधले आहे. या पुलावर वनविभागाचा नाका नसल्याने मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडांची तस्करी गोंडपिपरी, बल्लारशाहकडे होत आहे. या ठिकाणी वनविभागाचा तपासणी नाका असणे आवश्यक आहे.वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन वैनगंगा नदीवर जयरामपूर परिसरात पुलाला मंजुरी दिली. तीन वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. सदर पूल चंद्रपूूर जिल्ह्यातील घाटकूळ या गावाला जोडते. पुढे या मार्गाने गोंडपिपरीकडे जाता येते. या पुलाने परिसरातील नागरिकांसाठी प्रगतीची दारे खुली केली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान मौल्यवान असल्याने या सागवानाला राष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आष्टीजवळील पुलावरूनही गोंडपिपरीकडे जाता येते. मात्र या पुलावर वनविभागाचा नाका असल्याने सागवान तस्करी करणाऱ्यांवर वचक आहे. त्यामुळे तस्करांनी मुधोली पुलाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे. वाहनांना अटकाव होत नसल्याने वाहनातून सागवानाची तस्करी होत आहे. काही तस्कर कापसाच्या खाली सागवानी लठ्ठे टाकून तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाचा नाका उभारण्याची मागणी होत आहे.पुलाने उघडली प्रगतीची दारेजयरामपूर परिसरात अनेक गावे आहेत. सदर गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसली आहेत. येथील जमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी मिरची, भाजीपाला, कापूस, धान आदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र या शेतकऱ्यांना गावापासून २५ किमी अंतरावर असलेल्या चामोर्शीशिवाय पर्याय नव्हता. १० किमी अंतरावर गोंडपिपरी हे तालुकास्थळ आहे. गोंडपिपरी येथे कापूस, भाजीपाला, मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने येथील शेतकºयांसमोर पर्याय नव्हता. शासनाने पूल बांधल्यानंतर आता या परिसरातील शेतकºयांसाठी प्रगतीची दारे खुली आहेत. येथील बहुतांश शेतमाल गोंडपिपरी, बल्लारशाह येथील बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे चांगला भाव शेतमालाला मिळत आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी