शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

साेमनपल्ली पुलामुळे १८ गावांचा संपर्क जुळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला इंद्रावती नदीचे पुराचे पाणी येत हाेते. त्यामुळे नाल्यात पुराचे पाणी भरून असायचे. परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत हाेती. मागील वर्षी नागरिकांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाद्वारे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देबांधकाम प्रगतिपथावर : पावसाळ्यातील अवराेध संपुष्टात येणार

कौसर खानलाेकमत न्यूज नेटवर्कसिराेंचा : महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड या तीन राज्यांना जाेडणाऱ्या निजामाबाद-जगदलपूरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवर दाेन माेठ्या पुलाचे बांधकाम झाले; परंतु साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात १८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटत हाेता; परंतु आता येथील पुलाचे काम प्रगतिपथावर असल्याने पावसाळ्यातील अवराेध संपुष्टात येणार आहे. साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला इंद्रावती नदीचे पुराचे पाणी येत हाेते. त्यामुळे नाल्यात पुराचे पाणी भरून असायचे. परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत हाेती. मागील वर्षी नागरिकांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाद्वारे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. जवळपास १६ काेटी रुपयांचा खर्च पूल बांधकामावर केला जात आहे. काही महिन्यांतच हे बांधकाम पूर्ण हाेणार आहे. या पावसाळ्यात बांधकाम पूर्णत्वास येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पुलाअभावी दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील नागरिक नावेद्वारे नाला पार करीत हाेते. मागील वर्षी तेलंगणातील एका व्यापाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हाेता. त्यानंतरही नागरिकांनी येथे पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली हाेती. ती मागणी आता पूर्णत्वास जात आहे.

छत्तीसगड राज्याशीही तुटत हाेता संपर्कसिराेंचा तालुक्यातील १८ गावांसह छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रहदारी सदर नाल्याला आलेल्या पुरामुळे बंद व्हायची. त्यामुळे नागरिकांनी अनेकदा साेमनपल्ली नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली. येथील पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्गाला अवराेध ठरणारा प्रश्न निकाली निघणार आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक