शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रॉयच्या घरावर दुसऱ्या दिवशीही पडला हातोडा

By admin | Updated: February 19, 2017 01:12 IST

आष्टी रोडजवळील मोठ्या नहरला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४२/१ आराजीमधील ८.२८ हेक्टर पैकी १.६० हेक्टर आर

११ नागरिकांना बजावल्या नोटीस : १.६० हेक्टर आर जागेवर केले होते अतिक्रमण गडचिरोली : आष्टी रोडजवळील मोठ्या नहरला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४२/१ आराजीमधील ८.२८ हेक्टर पैकी १.६० हेक्टर आर शासकीय जागेवर अनाधिकृत अतिक्रमण धर्मा निमाई रॉय यांनी केले होते. या जागेवरीलही अतिक्रमण काढण्याची कारवाई शनिवारी महसूल प्रशासनाने केली व येथे धर्मा रॉय यांचे वास्तव्य असलेल्या आलिशान मकानाला जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. त्याच परिसरात असलेल्या अतिक्रमणीत धानाचे शेत, ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने सपाट करण्यात आले. याशिवाय त्याच परिसरातील शासकीय जागेवर अतिक्रमणधारक ११ नागरिकांना नोटीस बजावून २४ तासाच्या आत अतिक्रमण काढण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर हातोडा चालविल्याने उर्वरित चामोर्शी शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धर्मा रॉय यांचे अतिक्रमण पाडताना उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार अरूण येरचे, पोलीस निरिक्षक किरण अवचर, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, एस. के. बावणे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, तलाठी डी. एस. शेडमाके यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. धर्मा रॉय व त्यांच्या कुटुंबियांना भारतीय जनता पक्षाचे भक्कम वलय लाभलेले होते. भारतीय जनता पक्षातील राजकीय स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आतापर्यंत सदर कारवाई टाळली जात होती. मात्र महसूल प्रशासनाने शुक्रवारपासून या कारवाईला प्रारंभ केला व धर्मा रॉय याचे अतिक्रमण उदध््वस्त केले. दरम्यान धर्मा रॉय यांच्या आई चामोर्शी नगर पंचायतीच्या नगरसेवक मंजुषा निमाई रॉय यांनी न्यायालयाची स्थगिती असतानाही अतिक्रमण महसूल प्रशासनाने पाडले आहे. त्यामुळे आपले कुटुंब उघड्यावर आले असून शासनाने आपल्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत शनिवारी केली. (शहर प्रतिनिधी) घरातून हे सामान केले जप्त धर्मा रॉय राहत असलेल्या घरावर बुलडोजर चालविण्यापूर्वी प्रशासनाने या घरातील फ्रिज, एलपीजी, एलईडी, एसी, वॉटर प्युरीफायर, ज्युसर, तीन पलंग, लोखंडी गेट, ३८ पोते जयश्रीराम धान, महाराजा सोफा, पाच सिलिंग फॅन, शिलाई मशीन, वाशींग मशीन, आॅईल इंजिन, लोखंडी टेबल, बोअरवेल मोटार, कुकर, लाकडी मुख्य दरवाजा (सर्व प्रत्येकी एक), बे्रसलेट पिवळ्या धातूचे एक नग, चैन पिवळ्या धातूचे पाच नग, लॉकेट पिवळ्या धातूचे दोन नग, कानातले टॉप पिवळ्या धातूचे चार नग, नेकलस हार पिवळ्या धातूचे एक नग, अंगठी पिवळ्या धातूचे एक नग, मनी पिवळ्या धातूचे २० नग व रोख रक्कम २ हजार ५१५ नोटा, नाणे व इतर किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले.