शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते निर्मितीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: October 21, 2016 01:15 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मागील वर्षीच प्रत्येक जिल्ह्याला रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

१५२ किमीचे रस्ते : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना; दुर्गम व नक्षलग्रस्त भागाला प्राधान्यगडचिरोली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मागील वर्षीच प्रत्येक जिल्ह्याला रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र रस्ते निर्मितीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध न झाल्याने रस्ते निर्मितीचे काम ठप्प पडले होते. यावर्षी मात्र निधी उपलब्ध झाल्याने २०१५-१६ या वर्षातील कामांचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०१६-१७ या वर्षातील कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.ग्रामीण व दुर्गम भागात रस्ते निर्मितीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१५ या वर्षापासून सुरू केली. मागील वर्षी जरी या योजनेला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष कामांना मात्र सुरुवात झाली नव्हती. २०१५-१६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला ७७ किमीचे रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र मागील वर्षी यातील एकाही कामाला सुरुवात झाली नव्हती. २०१५-१६ मध्ये मंजुरी प्रदान झालेल्या रस्त्यांची कामे यावर्षी करण्यात येत आहेत. २०१५-१६ मध्ये एकूण २० रस्त्यांची कामे आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर १४ कामांचे वर्क आॅडरसुद्धा काढण्यात आले आहेत. दोन कामांची वर्क आॅडर काढण्याचे काम सुरू आहे. चार कामांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.२०१६-१७ या वर्षातील एकूण मंजूर कामांचे तीन टप्पे पाडण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात ७५.०२ किमीचे रस्ते करण्याला महाराष्ट्र शासनाने १ आॅक्टोबर रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सदर मार्ग निर्मितीसाठी अंदाजीत ४७ कोटी ५३ लाख ९३ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर या मार्गांची पुढील पाच वर्ष देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार रूपयांचा निधी अपेक्षित आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया २४ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील कामांना सुरुवात केली जाणार आहे. एकूण १५२ किमी रस्ते येत्या काही दिवसातच होणार आहेत. (नगर प्रतिनिधी)२०१५-१६ मधील कामे२०१५-१६ या वर्षात निर्मितीसाठी उद्दिष्ट प्राप्त झालेले. मात्र प्रत्यक्षात यावर्षी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये कुरखेडा तालुक्यातील गरगडा-कटंगटोला, वडेगाव ते धुतीटोला, देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर ते उसेगाव, आरमोरी ते शिवणी, धानोरा तालुक्यातील राज्य महामार्ग ते दुधमाळा, निमगाव ते मोहटोला, राज्य महामार्ग ते राजुली, राज्य महामार्ग ते गवळहेटी, गडचिरोली तालुक्यातील नगरी ते पोर्ला, चामोर्शी तालुक्यातील चाकलपेट ते मोहर्ली, कोेनसरी ते जयरामपूर, सिरोंचा तालुक्यातील राज्य महामार्ग ते गर्कापेठा, अहेरी तालुक्यातील उमानूर ते जोगनगुडा, सुधागुडा ते भवासपूर, राज्य महामार्ग ते इटलचेरू टोला, एटापल्ली तालुक्यातील जिल्हा मार्ग ते वासामुंडी, हालेवारा ते कोठी, उडेरा ते मरकल, भामरागड तालुक्यातील राज्य महामार्ग ते कुडकेली, राज्य महामार्ग ते तुमरगुडा या २० मार्गांचा समावेश आहे.