शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक ठप्प होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:59 IST

ताडगाव-मन्नेराजाराम मार्गावरील इरकुडुम्मे गावात व गावालगत चार पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊनही पुलांचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देपुलांचे बांधकाम अपूर्ण : ताडगाव, मन्नेराजाराम, इरकुडुम्मेवासीयांना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : ताडगाव-मन्नेराजाराम मार्गावरील इरकुडुम्मे गावात व गावालगत चार पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरूवात होऊनही पुलांचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.मन्नेराजाराम-डुब्बागुडा गावापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यातील इरकुडुम्मे गावात दोन पुलांचे बांधकाम तसेच गावापासून अर्ध्या किमी दूर अंतरावर एक पूल व दीड किमी अंतरावर आणखी एक पूल मंजूर करून त्याचे बांधकाम उन्हाळ्यात सुरू करण्यात आले आहे. बांधकाम अतिशय मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळा लागूनही बांधकाम पूर्ण झाले नाही.पूल बांधकामासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डा खोदण्यात आला आहे. नागरिक व वाहनांना जाण्यासाठी बाजुने रस्ता तयार करण्यात आला आहे. पावसामुळे बाजुच्या रस्त्यावर चिखल निर्माण होऊन या ठिकाणी वाहने फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प पडू शकते. विशेष म्हणजे, उन्हाळ्यातच बांधकाम सुरू करून सुध्दा बांधकाम पूर्ण झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पंचायत समिती सदस्य इंदरशहा मडावी यांनी या पुलाची पाहणी केली असता, अतिशय चिखल निर्माण झाला असल्याचे दिसून आले आहे. पुलाचे बांधकाम लवकर करावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला योग्य ते निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.विद्यार्थ्यांचे वाहन फसले३० जून रोजी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेले वाहन फसले. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वाहन काढावे लागले. पहिल्या पावसातच अशी दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यानंतर आणखी वाहने फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कलवटांचे काम लवकर करणे आवश्यक झाले आहे.