शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

रेगडी कालव्याची दुर्दशा

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. या तलावाच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा निर्मिती होण्यापूर्वीच सदर तलाव बांधण्यात आला. सदर तलाव दिनानदीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाला दिना प्रकल्प असेही संबोधण्यात येते. दिना नदी जंगलातून येत असल्याने या नदीच्या पाण्याच्या सहाय्याने सदर तलाव तत्काळ भरतो. तलावाजवळून पाण्याचा वेग जास्त राहत असल्याने कालवा क्षतिग्रस्त होण्याचे प्रमाण सर्वात जास्त राहते. त्यामुळे तलावाची निर्मिती झाल्यानंतर कालव्याच्या आतील बाजूने दगडाची पिचिंग करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात सदर पिचिंग कोसळली आहे. त्यामुळे कालव्याच्या बाजूची माती विरघडून दरड कोसळल्या आहेत. अगदी तलावाच्या जवळ पाण्याचा वेग अधिक राहत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. परिणामी कालव्याला मोठ- मोठे भगदाड पडले आहेत. या भगदाडांमुळे पाण्याचा अपव्ययही होत आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे याकडे मागील अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. हीच स्थिती उपकालव्यांचीही झाली आहे. दरवर्षी कालवे फुटण्यांमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वेळेवरच कालवा दुरूस्त करावा लागल्यामुळे अधिकची रक्कमही पाटबंधारे विभागाला मोजावी लागते. तेवढे दिवस शेताला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. कालवा फुटल्यानंतर शेतातील पिकांचेही नुकसान होते. याबाबी दरवर्षीच घडतात. यापासून पाटबंधारे विभागामात्र कोणतेही शहाणपण शिकण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या शेतीला या तलावाच्या पाण्याच्या सहाय्याने सिंचन केले जाते. अशा शेतकऱ्यांकडून एकरी पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रूपयांचा महसूल पाटबंधारे विभागाकडे गोळा होतो. यातून कालव्याची डागडूजी करणे सहज शक्य आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीही चिंंतेत पडले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन कालवा दुरूस्तीची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)