शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सहा हजार क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:55 IST

आदिवासी विविध कार्यकारी संस्था सोनसरीने खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ५ हजार ९०० क्विंटल धान अजुनही उघड्यावरच ताडपत्री झाकूनच आहे. सदर धान पावसाळ्यापूर्वी उचलणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देसोनसरी केंद्रावरील प्रकार : तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आदिवासी विविध कार्यकारी संस्था सोनसरीने खरीप हंगामात खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ५ हजार ९०० क्विंटल धान अजुनही उघड्यावरच ताडपत्री झाकूनच आहे. सदर धान पावसाळ्यापूर्वी उचलणे गरजेचे झाले आहे.सोनसरी संस्थेने मागील खरीप हंगामात सुमारे १३ हजार १३० क्विंटल धान खरेदी केले होते. त्यापैकी ५ हजार ८२९ क्विंटल धानाची उचल करण्यात आली. तर ७ हजार ३०० क्विंटल धान अजुनही शिल्लक आहे. यापैकी १ हजार ४०० क्विंटल धान संस्थेच्या गोदामात सुरक्षित ठेवले आहे. मात्र ५ हजार ८०० क्विंटल धान संस्थेच्या आवारात उघड्यावरच पडून आहे. जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसामुळे धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ताडपत्री कितीही चांगली झाकून असली तरी धान खराब होते. चार वर्षांपूर्वी उघड्यावर ठेवलेले धान खराब झाल्याने महामंडळाला शेकडो कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. याच बाबीची पुनरावृत्ती यावर्षीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धानाची उचल करावी, अशी मागणी होत आहे.सोनसरीचे सरपंच दादा प्रधान, माजी सरपंच चंदू प्रधान, वासुदेव समर्थ, मधुकर दहिकर, कुशन मानकर, आसाराम मडावी, परसराम पदा, जगन मडावी, देवनाथ जमदाळ, मोहन दहिकर, मनिराम वरचे, दीपक धोटे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कुरखेडाचे तहसीलदार यांना देऊन या गंभीर समस्येविषयी त्यांच्यासोबत चर्चा केली.