शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकावर पुन्हा वाढला रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:32 IST

आता वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा धानपिकावर कीड व विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन ते तीनदा फवारणी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांकडून दोन ते तीनदा फवारणी वातावरण बदलामुळे धान, कापूस, तूर व इतर पीक संकटात

 लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: एक ते दीड महिन्याआधी धानपिकावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. दरम्यान शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केल्याने रोगाची तीव्रता कमी झाली. मात्र आता वातावरणाच्या बदलामुळे पुन्हा धानपिकावर कीड व विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोन ते तीनदा फवारणी केली आहे.तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामात मुख्यत्वे धानपिकाची लागवड करतात. सद्य:स्थितीत धानपीक गर्भावस्थेत आहे. अशा स्थितीत पिकाला रोगाने ग्रासले असून पीक रोगमुक्त करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करताना दिसून येत आहेत.

तालुक्यातील बहुतांश शेतकरी जास्त मुदतीच्या जड प्रतीच्या धानपिकाची लागवड करतात. दिवसेंदिवस पीक लागवडीचा खर्च वाढत चालला आहे. वातावरणातील बदलामुळे पिकावंर रोग व किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कीटकनाशक फवारणीपोटी शेतीच्या खर्चात वाढ होत आहे. धानपिकाला पूर्वी केवळ खताची मात्रा दिली जात होती. मात्र आता शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत तीन ते चारदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. परिणामी खतापेक्षा कीटकनाशकाचाच खर्च अधिक असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. आत्मा व कृषी विभागाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून धान, कापूस व सोयाबीन पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या कीटकनाशकाची किती प्रमाणात व कशा पद्धतीने फवारणी करावी, याबाबतची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. शेतीशाळेच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना पीक लागवड व रोग, कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. चामोर्शी तालुक्याच्या ग्रामीण भागात गावासभोवतालचे शेतशिवार धानपिकाने हिरवेगार दिसून येत आहे. मात्र पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सकाळच्या सुमारास अनेक शेतकरी व मजूर पाठीवर पम्प घेऊन फवारणी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील बºयाच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोरोना लॉकडाऊनमुळे खालावली आहे. कीटकनाशक फवारणीचा खर्च शेतकऱ्यांना झेपत नसल्याने शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर कीटकनाशक व औषधी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.कपाशीवर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भावचामोर्शी तालुक्यात खरीप हंगामात धानपिकासोबतच अनेक शेतकरी कापूस तसेच भाजीपाला पिकाची लागवड करतात. यावर्षी चामोर्शी तालुक्यात पर्जन्यमान बऱ्यापैकी झाल्याने कापूस पीक जोमात आले. फळधारणा अवस्था सुरू असताना कपाशी पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला. आता कापूस पीक रोगमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून फवारणी केली जात आहे.

टॅग्स :agricultureशेती