गडचिराेली :छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील काेपर्शी जंगलात माेओवादी व पाेलिस यांच्यात २७ ऑगस्ट राेजी चकमक उडाली. या चकमकीत चार माेओवादी ठार झाले. या सर्वांची ओळख पटली आहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मालू पदा (४१, रा. बुर्गी, जिल्हा कांकेर छत्तीसगड), क्रांती ऊर्फ जमुना रैनू हलामी (३२, रा. बाेधीनटाेला, ता. धानाेरा), ज्याेती कुंजाम (२७, रा. बस्तर, छत्तीसगड), मंगी मडकाम (२२, रा. बस्तर, छत्तीसगड) अशी मृतकांची नावे आहेत. यातील मालू पदा हा कंपनी क्रमांक १० मध्ये पीपीसीएम या पदावर कार्यरत हाेता. त्याच्यावर सहा लाखांचे बक्षीस हाेते. क्रांती हलामी ही कंपनी क्रमांक १० मध्ये सदस्य हाेती. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस हाेते. ज्याेती कुंजाम ही अहेरी दलमची सदस्य हाेती. तिच्यावर दाेन लाखांचे बक्षीस हाेते.
मंगी मडकाम ही गट्टा दलमचा सदस्य हाेती. तिच्यावर दाेन लाखांचे बक्षीस हाेते. या सर्वांचा चकमक, खून, जाळपाेळ यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभाग हाेता, अशी माहिती पाेलिस अधीक्षक यांनी दिली आहे.
आता उरले केवळ २५ माेओवादीजिल्ह्यात आता केवळ कंपनी क्रमांक १० व गट्टा दलममध्येच माेओवादी कार्यरत आहेत. पाेलिसांकडे असलेल्या गाेपनीय माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्यात २८ माओवादी हाेते. त्यापैकी तीन माओवादी २७ ऑगस्टच्या चकमकीत मारल्या गेले. एक मृतक मंगी मडकाम हिची छत्तीसगड राज्यात नाेंद आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ २५ माओवादी शिल्लक आहेत. मार्च २०२६ पर्यंत जिल्हा माओवादमुक्त हाेईल, अशी अपेक्षा पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांनी दिली.